JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मित्राकडून हत्येचा प्रयत्न; पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात, धक्कादायक Video आला समोर

मित्राकडून हत्येचा प्रयत्न; पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात, धक्कादायक Video आला समोर

पोटात चाकू अकडलेल्या अवस्थेत तरुण पोलीस ठाण्यात आला, या घटनेचा धक्कादायक VIDEO समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 7 जून : नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक तरुण पोटात चाकू घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हत्येच्या प्रयत्नातून तरुणाच्या पोटात चाकू खुपल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. हत्येच्या झालेल्या प्रयत्नात चक्क तरुणाच्या पोटात चाकू अडकला. पोटात चाकू घेऊन तरुण पोलीस ठाण्यात पोहोचला. (Nagpur Crime news) या जखमी तरुणाचं नाव विनय राबा आहे. मित्रांसोबतच्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे. या घटनेत आणखी दोन मित्र जखमी झाले आहेत. विनयच्या पोटात चाकू घुपसल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

हे ही वाचा- Shocking : लालची सासऱ्यानं सुनेला 80 हजारांमध्ये विकले, पण यामुळं फसला प्रयत्न या व्हिडीओमध्ये मुलाच्या पोटात चाकू अडकल्याचं दिसत आहे. अशाच अवस्थेत हा तरुण पोलीस ठाण्यात दाखल झाला. काही वेळाने हा तरुण मित्राच्या बाईकच्या मागे बसण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच वेळेत तो पोलिसांच्या गाडीच्या दिशेने चालू लागतो. तरुणाच्या पोटातून रक्त वाहत आहे. शिवाय त्याच्या डोक्यालाही मारहाण झाल्याचं दिसत आहे. हा भयंकर व्हिडीओ येथे उभ्या असलेल्या व्यक्तीने काढला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या