JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करून खाली फेकण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करून खाली फेकण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

आठगाव स्थानकावरुन रेल्वे गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 28 नोव्हेंबर : धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local train) तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य रेल्वेच्या आठगाव ते कसारा (Kasara) या रेल्वे स्थानकात ही घटना घडली. याप्रकरणी कल्याण पोलिसांनी (Kalyan Police)दोन जणांना अटक केली आहे. अमोल जाधव आणि अमन हिले अशी या आरोपींची नाव आहेत. कसारा येथे राहणाऱ्या एक 21 वर्षीय तरुणी ठाण्यातील (Thane) एका मॉलमध्ये मोठ्या पदावर कामाला आहे. ही तरुणी दररोज कसारा ते ठाणे दरम्यान लोकलने प्रवास करते. नेहमीप्रमाणे 25 नोव्हेंबरला ही तरुणी ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात चढली. त्यावेळी लोकलमध्ये अनेक महिला होता. मात्र, आठगाव स्थानकापर्यंत ही ट्रेन रिकामी झाली होती. त्यामुळे त्या लोकलच्या डब्ब्यात ही तरुणी एकटीच होती. देवांची पूजा नको करू, मुस्लीम धर्माचा स्वीकार कर अन्यथा…मधुमिताची घुसमट यावेळी आठगाव स्थानकावरुन रेल्वे गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली होती. तिने लगचे तिच्या मोबाईलवर दोघांचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले. या दरम्यान या दोघांनी तरुणीचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. या तरुणीने शेवटपर्यंत प्रतिकार करत होते. या झटापटीत तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत गाडी कसारा स्थानकात पोहोचली होती. त्यावेळी एक तरुण पसार झाला. तर दुसऱ्या आरोपीला तरुणीच्या नातेवाईकांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील? भाजपच्या टीकेला रोखठोक उत्तर आरोपी अमोल जाधव आणि अमन हिले हे दोघे ठाण्याला एका कंपनीत कामाला आहेत. या दोन्ही आरोपींच्या विरोधात 307, 354 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या