JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / विरारमध्ये खदानीत पडल्यानं अज्ञात व्यक्तीचा बुडून मृत्यू, परिसरात खळबळ

विरारमध्ये खदानीत पडल्यानं अज्ञात व्यक्तीचा बुडून मृत्यू, परिसरात खळबळ

आज सकाळी विरार (Virar) पूर्वेकडील कादर कंपाऊंड परिसरातील खदानीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Unknown person Dead body) आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विरार, 23 मे: आज सकाळी विरार (Virar) पूर्वेकडील कादर कंपाऊंड परिसरातील खदानीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Unknown person Dead body) आढळल्यानं खळबळ उडाली आहे. खदानीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं काही स्थानिकांनी पाहिलं. यानंतर त्यांनी संबंधित घटनेची माहिती विरार पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळवली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आहे. यावेळी खदानीच्या आसपास अनेक बघ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संबंधित मृत व्यक्तीचा तोल गेल्यामुळे तो पाण्यात पडला असावा, यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण हा अपघात की घातपात याबाबत कोणताही पुरावा अद्याप समोर आला नाही. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल. हे ही वाचा- पुण्यात कर्जाचं व्याज न दिल्यानं विद्यार्थ्याचं अपहरण;हॉस्टेलमध्ये डांबून मारहाण संबंधित मृत व्यक्ती नेमकी कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यासाठी स्थानिक लोकांची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास विरार पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या