JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / हा VIDEO पाहून पंतप्रधानही सुन्न होतील; बापाच्या हत्येनंतर 4 वर्षांच्या लेकराची मोदींना आर्त हाक

हा VIDEO पाहून पंतप्रधानही सुन्न होतील; बापाच्या हत्येनंतर 4 वर्षांच्या लेकराची मोदींना आर्त हाक

आपल्या बोबड्या शब्दात या 4 वर्षांचा लहानगा मोदींकडे न्यायाची मागणी करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Birthday) यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने देशभरातील नागरिक त्यांना शुभेच्छा देत आहेत. मात्र आसाममधील (Assam Crime news) 4 वर्षांच्या एका लहानग्याने यानिमित्ताने नरेंद्र मोदींकडे न्यायाची मागणी केली आहे. आसाममधील कछार जिल्ह्यातील चार वर्षांच्या लहानग्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहानगा आपल्या वडिलांच्या हत्येसाठी न्यायाची मागणी करीत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुलाच्या हातात एक प्लेकार्ड दिसत आहे. ज्यावर लिहिलं आहे की, मला न्याय द्या…या व्हिडीओमध्ये मुलागने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री हेमेंत बिस्वा यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. (After the murder of his father 4 year old boy from Assam is demanding justice on Prime Minister Narendra Modis birthday)

संबंधित बातम्या

45 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रिजवान शाहिद लश्कर म्हणतो…माझं नाव रिजवान शाहिद लश्कर आहे. प्रिय महोदय, जेव्हा मी 3 महिन्याचा होतो तेव्हा 26 डिसेंबर 2016 (केस संख्या 121/2017) या साली 11 नराधमांनी माझ्या वडिलांची हत्या केली होती. आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो. मला न्याय हवाय.. हे ही वाचा- Happy Birthday…आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 71 वा वाढदिवस मिळालेल्या माहितीनुसार, रिजवानचे वडील कंत्राटदार आहेत. वाळू माफियातील सदस्यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ त्यांची हत्या केली होती. रिजवानची आईने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही या प्रकरणात गुन्हा दाखल करू घेतला. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महिलेने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं की, त्यांनी माझ्या पतीची हत्या करण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर केला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र अद्यापही दोघांनी अटक बाकी आहे. आरोपी अजूनही आमच्या घराच्या आसपास फिरताना दिसतात. आम्ही असुरक्षित आहोत, आम्हाला न्याय हवा. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, रिजवानच्या काकांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या पुतण्याला ट्विटर अकाऊंट उघडून दिलं आणि व्हिडीओ अपलोड करायला मदत केली. काकांनी सांगितलं की, आरोपींना अतंरिम जामीन मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या