JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 10 वर्षांचं प्रेम, लग्न मात्र 10 महिनेच टिकलं; दुसऱ्या लग्नासाठी घेतला घटस्फोट

10 वर्षांचं प्रेम, लग्न मात्र 10 महिनेच टिकलं; दुसऱ्या लग्नासाठी घेतला घटस्फोट

लग्नाच्या 10 महिन्यातच दोघांमध्ये ताटातूट झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 4 मार्च : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) लखनऊच्या इंटोजा निवासी आशमा हिने स्वप्नातही विचार केला नसेल की, 10 वर्षांपासून ती ज्या तरुणावर प्रेम करीत आहे. त्याच्यासोबत लग्नाच्या 10 महिन्यातच वेगळं होण्याची वेळ येईल. या सर्व प्रकाराने (Crime News) तरुणाने मात्र घटस्फोट घेत तरुणीला घराबाहेर काढलं. आता आशमा पतीला शिक्षा देण्यासाठी पोलिसात आणि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहे. इंटोजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीं विरोधात हुंड्यासाठी त्रास देणं आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षीदारांच्या आधारावर आरोपींच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. शाहजहापूरमध्ये एका लग्नात झाली ओळख.. साधारण 10 वर्षांपूर्वी शाहजहापूरमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नात आशमा खातूनची शहजहापूरच्या इरशादसोबत ओळख झाली होती. यानंतर दोघेही फोनवर बोलू लागले. दोघांमधील मैत्री प्रेमात बदलली. यानंतर 26 जून 2020 रोजी त्यांनी लखनऊमध्ये लग्न केलं. काही दिवसानंतर सासरची मंडळींनी हुंड्यासाठी त्रास सुरू केला. मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सासरच्या मंडळींनी काहीच ऐकून घेतलं नाही. सासरच्यांकडून छळ वाढत असल्याने 30 सप्टेंबर 2021 रोजी पती, सासरा, नणंद, आणि इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनीही काहीच कारवाई केली नसल्याने सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू होता. हे ही वाचा- खून करून महिलेचा मृतदेह जमिनीत गाडला; 4महिन्यांनी उलगडलं गूढ, बीडमधील थरारक घटना घर वाचवण्यासाठी तरुणी पुन्हा गेली सासरी.. आशमाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल केल्यानंतर पतीने तोडगा काढण्यासाठी दबाव आणला. त्याचं म्हणणं ऐकून तरुणी पुन्हा एकदा घर वाचवण्यासाठी त्याच्याकडे गेली. यानंतर 23 डिसेंबर 2021 रोजी ती सासरी गेली. मात्र सर्वांनी तिला ओळखण्यास नकार दिला. इतकच नाही तर पती इरशादने शरियतचा हवाला देत अवैध पद्धतीने तीन वेळा तलाक देत धक्का देऊन घराबाहेर काढलं. त्याने दुसऱ्या महिलेसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं. तरुणीने सासरच्या मंडळींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे कोणीच तिला प्रतिसाद दिला नसल्याने ती पुन्हा एकदा पोलिसांकडे गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या