JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / विवाहित प्रेयसीची हत्या, तर प्रियकराचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला, प्रेम प्रकरणाचा दुःखद अंत

विवाहित प्रेयसीची हत्या, तर प्रियकराचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला, प्रेम प्रकरणाचा दुःखद अंत

प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट झाला आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ओम बाबू मिश्र, प्रतिनिधी कानपूर, 29 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. प्रेमसंबंधातून, अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या कानपूर शहरातील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री सासू बरखा सैनी या तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

माध्यमांना माहिती देताना मुलीचे वडील ओमप्रकाश सैनी यांनी सांगितले की, त्यांची मुलगी बरखा आणि तिची दोन मुले सासरच्या ठिकाणाहून त्यांच्या मेव्हण्याच्या तेराव्याला हजेरी लावण्यासाठी आले होते. कार्यक्रमानंतर ती आपल्या कुटुंबीयांसह माहेरच्या घरी आली. रात्री अकराच्या सुमारास तिच्या आजीने जेव्हा बरखाला फोन केला असता बरखाने प्रतिसाद दिला नाही. यानंतर नातेवाईकांनी जाऊन पाहिले असता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली होती. बरखाचा रक्तबंबाळ मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितल्यावर पोलीस तात्काळ तेथे पोहोचले. डीसीपी सेंट्रल आरती सिंह यांनी सांगितले की, ही घटना पाहता प्रथमदर्शनी हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे असल्याचे दिसते. पतीने दीपक गुप्ता याच्या नावाने तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्येही दीपक गुप्ता बाहेर जाताना दिसत आहे. शक्यतो बरखा सैनीची हत्या तिच्या प्रियकराने गळा चिरून केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर प्रियकराचा मृतदेहही रेल्वे रुळावर पडलेला आढळून आला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या