JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / घशातील खवखवीमुळे चाचणी केली तर पतीला Last stage Cancer, दाम्पत्याचं धक्कादायक पाऊल

घशातील खवखवीमुळे चाचणी केली तर पतीला Last stage Cancer, दाम्पत्याचं धक्कादायक पाऊल

तीन वर्षांपूर्वीच याचं लग्न झालं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 मे : नवी दिल्लीतील (New Delhi News) नोएडामध्ये सेक्टर-22 मध्ये शुक्रवारी रात्री दाम्पत्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Husband and wife suicide) केली. सेक्टर-24 पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितलं की, सोनभद्र जिल्हा निवासी अरूण सिंह (31) यांनी पत्नी शशी कला (29) याच्यासोबत सेक्टर-22 मध्ये भाड्याने राहत होते. अरूण सेक्टर-62 मध्ये एका कंपनीत टेक्निशिअन होते. अरूणला गेल्या काही दिवसांपासून घशाचा त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अनेक चाचण्या केल्या. ज्यात ते कर्करोगाच्या शेवटच्या स्टेजवर असल्याचं कळालं. यानंतर दाम्पत्य तणावात होते. यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट सापडली आहे. ज्यात त्यांनी दोघांच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार ठरवलं नाही. तीन वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. अरूण गेल्या अनेक वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता. घशात खवखव होत असल्याने अरूणने चाचण्या केल्या. 25 एप्रिल रोजी अरूणच्या मेडिकल चाचणीचे रिपोर्ट आले. यात अरूणला कॅन्सर असल्याचं समोर आलं. धक्कादायक म्हणजे कॅन्सर शेवटच्या स्टेजवर होतं. यानंतर दाम्पत्य तणावात बुडालं. आणि दोघा पती-पत्नीने अत्यंत धक्कादायक पाऊल उचललं. हे ही वाचा- क्लबमध्ये अल्पवयीन मुलीचा न्यूड व्हिडीओ कांड; 6 दिवसांपासून झाली भयंकर व्यवस्था 29 एप्रिल रोजी दाम्पत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या… 29 एप्रिल रोजी दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं की, अरूणला त्याच्या नातेवाईकांनी फोन केला होता. मात्र अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन उचलला नाही. यानंतर कुटुंबीयांनी अरूणच्या कंपनीत त्याच्या सहकाऱ्यांना फोन केला. त्यांनी अरूण कामावर आलाच नसल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली.

खोलीत लटकलेल्या अवस्थेत पती-पत्नी.. खोलीचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी कसंबसं दार तोडून आत प्रवेश केला. तर पती-पत्नीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. यावेळी सुसाइड नोटही सापडली. ज्यात त्यांनी पती कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर असल्याचंही सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या