बंगळुरू, 14 मे : कर्नाटकाच्या बंगळुरुतून (Bengaluru) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मुलीवर अॅसिड फेकल्याप्रकरणी (Acid Attack on Girl) आरोपीला थेट तामिळनाडूतील एका आश्रमातून अटक करण्यात आली आहे. या आश्रमात हा आरोपी साधूचा वेश धारण करुन राहत होता. नागेश असे आरोपीचे नाव आहे. मुलीवर अॅसिड हल्ला केल्यानंतर तो आरोपी फरार झाला होता. याच्या अटकेसाठी पोलिसांनी 7 पथके तयार केली होती. प्रेमाला नकार दिला अन्… प्रेमाला नकार दिल्यानंतर त्याने एका मुलीवर अॅसिड हल्ला केला होता. ही घटना 28 एप्रिलला कामाक्षीपाल्या परिसरात घडली. आरोपी नागेश एक कपड्यांची कंपनी चालवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश हा त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडला होता. मात्र, मुलीने त्याला नकार दिला. यानंतर मुलीने त्याला दिलेला नकारानंतर संतापात त्याने त्याच मुलीवर अॅसिड हल्ला केला. या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली होती. यानंतर आरोपी नागेशला पकडण्यासाठी 7 वेगवेगळी पोलिस पथके तयार करण्यात आली होती. तर दुसरीकडे अटकेच्या भीतीने आरोपी नागेश हा तामिळनाडू जाऊन पोहोचला होता. तसेच वेल्लोर जवळच्या एका आश्रमात जाऊन तो लपला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्या आश्रमात त्याने साधूचाही वेश धारण केले होता. मात्र, अखेर पोलिसांनी त्याला पकडले. हेही वाचा - डॉक्टरची आत्महत्या; आधी व्हॉट्सअॅपवर स्टाफला केला मेसेज, म्हणाला….
पीडितेला आर्थिक मदत देणार - कर्नाटकचे आरोग्यमंत्री
दरम्यान, अॅसिड हल्ला झालेल्या मुलीची तब्येत गंभीर आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले की, पीडित मुलीच्या सर्व उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. तसेच तिला आर्थिक मदतही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. देशात याआधीही मुलींवर अॅसिड हल्ला केल्याची प्रकरणे समोर आली आहे. यात मुलीने प्रेमाला नकार दिल्यानंतर संतापात प्रेमीने मुलीवर अॅसिड हल्ला केला आहे. या घटना पाहता काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने उघड्यावर अॅसिड विक्रीवर बंदी घातली होती. असे असतानाही या आरोपींना अॅसिड सहज उपलब्ध होते.