JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, आरपीआयच्या कोकण अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी

प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, आरपीआयच्या कोकण अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी

नवी मुंबईतून आरपीआय पक्षाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

जाहिरात

जगदीश गायकवाड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, प्रतिनिधी ठाणे, 29 नोव्हेंबर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आता नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टीचे कारण काय - जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना शिवीगाळ केल्याची आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यानंतर त्यांनी स्वपक्षीय नेत्यांवर देखील टीका केली होती. यासंबंधीचा ऑडिओ व्हायरल झाल्यामुळे जगदीश गायकवाड यांची पक्षातून करण्यात हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंगे यांनी याबाबतचा निर्णय घेतला. हेही वाचा -  14 वर्षांच्या मुलीचे भयावह कृत्य, 5 वर्षांच्या बहिणीचा ब्लेडने कापला गळा, जालना हादरलं औरंगाबादमध्येही आरपीआयच्या पदाधिकाऱ्याकडून धक्कादायक कृत्य - रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विवाहित महिलेसोबत बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित महिलेच्या पतीला धमकावून तिला पतीपासून विभक्त केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच तुझ्या मुलांना सांभाळेल, तुझ्या सोबत लग्न करेल, तुला घर देईल असे आमिष दाखवून शहरातील राजनगर परिसरात रूम घेऊन वारंवार महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातून महिला गरोदर राहिली त्यानंतर महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता वारंवार करून महिलेच्या पोटात लाथ मारून गर्भपात केला. तू जर कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांना ठेवणार नाही असे धमकावले. मात्र त्रास असह्य झाल्यावर महिलेने पोलिसात धाव घेतली. महिलेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कांबळे याला तात्काळ अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या