ग्वालियर, 2 सप्टेंबर : हुंड्यातून (Dowry) अधिकाधिक पैसा (Money) मिळवण्यासाठी एका तरुणाने दोन लग्नं (Two Marriages) करून दोन्ही तरुणींची फसवणूक (Cheating) केल्याचं प्रकरण नुकतंच उघडकीला आलं आहे. पहिली पत्नी माहेरी असताना या तरुणाने दुसरं लग्न केलं. मात्र दुसऱ्या पत्नीला पहिल्या लग्नाविषयीची माहिती कळताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पहिल्या लग्नात 25 लाखांचा हुंडा मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये राहणाऱ्या 32 वर्षांच्या तरुण सिंघानिया नावाच्या व्यक्तीने आपण बंगळुरूमध्ये इंजिनिअर आहोत, असं सांगून रिटा कुशवाहा नावाच्या तरुणीशी लग्न केलं होतं. तिच्या कुटुंबीयांकडून त्याने लग्नासाठी 25 लाख रुपयांचा हुंडा आणि इतर वस्तू मिळवल्या. काही दिवस सुखाचा संसार झाल्यानंतर रिटा काही दिवसांसाठी माहेरी गेली. माहेराहून परत आल्यानंतर तिला सासरी विचित्र अनुभव यायला सुरुवात झाले. तरुण सिंघानियाच्या वडिलांनी म्हणजे रिटाच्या सासऱ्यांनी अधूनमधून तिची छेड काढायला आणि तिला त्रास द्यायला सुरुवात केली. याबाबत तिनं तरुणकडे तक्रार केली. मात्र तरूणनं या प्रकाराकडे पूर्ण डोळेझाक करत लक्ष देणं टाळलं. त्यानंतर भांडण झाल्यामुळे रिटा माहेरी निघून गेली होती. तरुणचं दुसरं लग्न रिटा माहेरी गेल्याची संधी साधत तरुणानं नम्रता कुशवाहा तरुणीशी सूत जुळवलं. तिच्यासोबत ओळख वाढवून तिला लग्नाची मागणी घातली. आपण इंजिनिअर असल्याचं सांगत तिला लग्नासाठी तयार केलं. 2 जुलै 2021 या दिवशी त्यांचं लग्न झालं. या लग्नात तरुणनं 15 लाख रुपयांचा हुंडा घेतला, अशी बातमी ‘ दैनिक भास्कर ’ने दिली आहे. असं फुटलं बिंग नम्रता घराची साफसफाई करत असताना तिला तिच्या पतीचा पहिल्या लग्नातला फोटो सापडला. त्याचबरोबर पहिल्या पत्नीसोबत सुरु असलेल्या पोलीस खटल्याची कागदपत्रंही सापडली. हे पाहताच तिने रिटाशी संपर्क साधत खातरजमा केली. मग रिटा आणि नम्रता या दोघींनी एकत्रितपणे पोलिसांत धाव घेऊन तरुणविरोधात तक्रार दाखल केली. हे वाचा - 8 लग्न करणारी तरुणी निघाली एड्स बाधित; संपर्कात असलेल्यांचे धाबे दणाणले पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दोन लग्नं करणे, हुंडा घेणे आणि फसवणूक करणे या कलमाखाली गुन्हे नोंदवण्यात आले असून कारवाई सुरु करण्यात आली आहे.