मालेगाव, 25 फेब्रुवारी : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका शेतावर धाड टाकून अफूची शेती उद्ध्वस्त केली आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे 50 लाख रुपये किंमतीचे तब्बल एक हजार किलो अफूची बोंडे जप्त केली आहे. या प्रकरणी 3 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीणच्या विशेष पोलीस पथकाने सापळा रचून मालेगावच्या घाणेगाव येथे धाड टाकून 32 गुंठ्यावर लागवड करण्यात आलेली अफूची शेती उद्ध्वस्त केली. एका शेतात अफूची लागवड केल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार, पोलीस निरिक्षक देविदास ढुमणे,उपनिरिक्षक पाटील, मोरे व इतर बारा जणांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळून आली. ऋतिक रोशनला ‘या’ वेब सीरिजसाठी 75 कोटींची ऑफर; मात्र केला नाही स्वीकार! पोलिसांनी सर्व झाडे व बोंडे जप्त करून त्याचे मोजमाप केले असता त्याचे वजन एक हजार किलो भरले. बाजारात अफूच्या या बोडांची किंमत 50 लाखांपर्यंत असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. नाना पटोलेंनंतर कोण होणार विधानसभा अध्यक्ष? निवडणुकीबाबत हालचालींना वेग या प्रकरणी रामेश्वर संसारे, गोकुळ संसारे व निंबा शिल्लक या तीन शेतकऱ्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात आणखी काही शेतकरी अफूची शेती करत आहे, का याचा पोलीस तपास करीत आहे.