रायपूर, 26 ऑगस्ट : शेजारी (Neighbor) काळी जादू (Black magic) करत असल्यामुळेच आपली बहिण (sister gets ill) आजारी पडते, असं वाटल्याने तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी शेजाऱ्याचा खून (murder) केला आहे. कुटुंबातील एक मुलगी सतत आजारी असायची. काळ्या जादूचा परिणाम म्हणूनच ती सारखी आजारी पडत असल्याचा संशय कुटुंबाला होता. यावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यवसान खुनात झालं. काळ्या जादूचा संशय छत्तीसगडमधील धरसिंवा गावात 18 वर्षांचा वासू कुमार, त्याचा अल्पवयीन भाऊ, 40 वर्षांची आई आणि बहिण मीनाक्षी यांच्यासह राहत होता. मीनाक्षी वारंवार आजारी पडत असल्यामुळे हे कुटुंब चिंताग्रस्त होतं. शेजारी राहणारा महावीर चक्रधारी काळी जादू करत असल्यामुळेच आपली बहिण आजारी पडत असल्याचा संशय या सर्वांना होता. यावरून वासू कुमार आ चक्रधारी यांच्यात काही दिवसांपूर्वी कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र शेजाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे ते भांडण तात्पुरतं सुटलं होतं. मीनाक्षी पडली आजारी काही दिवसांपूर्वी मीनाक्षी आजारी पडली. यावेळी तिचा आजार काहीसा गंभीर होता. ती थरथरू लागली होती आणि तिला कापरे भरत असल्याचं दिसत होतं. नुकत्याच झालेल्या भांडणानंतर शेजाऱ्याने पुन्हा एकदा काळी जादू केली असावी, असा संशय वासू कुमारच्या मनात निर्माण झाला. त्याचा रागाचा पारा चढला आणि सर्व कुटुंबानं गिरधारीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला, अशी बातमी ‘ दैनिक भास्कर ’ने दिली आहे. हे वाचा - LOVE, लग्न आणि पलायन! लग्नाच्या 55 व्या दिवशी पळाली नववधू वासू कुमार, त्याचा अल्पवयीन भाऊ, पत्नी शकून आणि आणखी एक साथीदार असे चौघे गिरधारीच्या घरात घुसले आणि त्याला दांडक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. गिरधारीचा मृत्यू होईपर्यंत या सर्वांनी त्याला मारहाण केली. अनेक घाव वर्मी लागल्याने गिरधारीचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.