JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 'कपड्यांप्रमाणे बदलतो बायको'; आठवड्यापूर्वी सहावं लग्न करणाऱ्या माजी मंत्र्याचा भांडाफोड

'कपड्यांप्रमाणे बदलतो बायको'; आठवड्यापूर्वी सहावं लग्न करणाऱ्या माजी मंत्र्याचा भांडाफोड

लग्नानंतर शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप माजी मंत्र्यांच्या चौथ्या पत्नीने केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आग्रा, 2 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील पोलीस ठाण्यात 6 लग्न करणारे माजी मंत्री चौधरी बशीर यांच्याविरोधात तीन तलाकचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा त्यांची चौथी पत्नी नगमा हिने दाखल केला आहे. माजी मंत्री कपड्यांप्रमाणे बायको बदलत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय माजी मंत्र्यांवर आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हा गुन्हा एसएसपी यांच्या आदेशानंतर दाखल करण्यात आला आहे. महिलांसोबत गैरवर्तनाचा आरोप 2012 मध्ये नगमा यांनी चौधरी बशीर यांच्यासोबत विवाह केला. लग्नानंतर त्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवले. या प्रकरणी चौधरी बशीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये तो 23 दिवसांसाठी ते तुरुंगातही होते. चौधरी बशीरवर आरोप करणाऱ्या नगमाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये नगमाने माजी मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. **8 दिवसांपूर्वी सहावे लग्न आहे हे ही वाचा-** न्यायाधीश हत्या प्रकरणात मोठी कारवाई; ‘त्या’ Video मुळे एक पोलिसही निलंबित नगमाने सांगितले की, ती तीन वर्षांपासून तिच्या माहेरच्या घरात राहत आहे. तिचा न्यायालयात चौधरी बशीरसोबत वाद सुरू आहे. 23 जुलै रोजी त्यांना कळलं की, चौधरी बशीर पुन्हा लग्न करणार आहेत. ती त्याच्याकडे गेली, पण तिथून तिला तीन वेळा तलाक सांगून काढून टाकण्यात आले. नगमा म्हणाली की, तिने शाहिस्ता नावाच्या महिलेशी सहावे लग्न केले आहे. माजी मंत्री आधीच विवाहित आहे आणि तिचा तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट देखील झालेला नाही. आमदार गजालासोबत पहिला विवाह 2003 मध्ये चौधरी बशीर यांनी कानपूरमधील आमदार गजाला यांच्यासोबत प्रेम विवाह केला होता. बीएसपी सुप्रीमो मायावती यांनी दोघांचं लग्न लावून दिलं होतं. यानंतर दोघे बीएसपीमधून समाजवादी पक्षात गेले. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र नंतर दोघांचा तलाक झाला. नगमाने सांगितलं की, दुसरं लग्न गिन्नी कक्कंड हिच्यासोबत हिंदू पद्धतीने झाली. तिसरं लग्न दिल्लीतील तरन्नूमसोबत झालं आणि चौथं तिच्यासोबत. माजी मंत्र्यांनी 2018 मध्ये पाचवं लग्न रुबीना नावाच्या मुलीशी केलं. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्र्यांविरोधात मुस्लीम महिला संरक्षण अधिनियम तीन तलाक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या