JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 'कोण नाय कोणचा' पॅटर्न, 15 वर्षांच्या पोराने केला शाळेबाहेर विद्यार्थ्यावर चाकू हल्ला, पडले 19 टाके

'कोण नाय कोणचा' पॅटर्न, 15 वर्षांच्या पोराने केला शाळेबाहेर विद्यार्थ्यावर चाकू हल्ला, पडले 19 टाके

पीडित विद्यार्थी स्कूटरवर बसलेला असताना आरोपीने चाकू काढला आणि त्वरीत चाकूने हल्ला केला.

जाहिरात

'कोण नाय कोणचा' पॅटर्न, 15 वर्षांच्या पोराने केला शाळेबाहेर विद्यार्थ्यावर चाकू हल्ला, पडले 19 टाके

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 03 डिसेंबर : मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थ्याला चाकूने जखमी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेचा परिसरातील नागरिकांनी चित्रित केलेला व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत 26 नोव्हेंबर रोजी दहावीच्या 2 विद्यार्थ्यांमध्ये पूर्वीच्या एका भांडणावरून वाद झाला. यातील एका १५ वर्षीय विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करून जखमी केले. या घटनेचा व्हिडीओ परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर चित्रीत केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला जवळील ट्रायडंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यामुळे विद्यार्थ्याला 19 टाके पडले होते. उपचारानंतर बुधवारी त्या विद्यार्थ्याला डिस्चार्ज देण्यात आला. (Dhule Murder : पोरगं दारू पिऊन वाया गेलं, घरच्यांनाच मारायचं, आई कंटाळली अन् दिली सुपारी, पुढे जे घडलं) या व्हिडीओची दखल घेऊन, कांदिवली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला.“आरोपी फरार असून कांदिवली पोलीस आरोपी मुलाचा शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि आरोपी कांदिवली पश्चिमेकडील एका शाळेत वेगवेगळ्या विभागात शिकतात. तपासादरम्यान असे समजले की, घटनेच्या काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये एका मुद्द्यावरून भांडण झाले होते. यातूनच आरोपीने रागाच्या भरात त्या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. ( नराधम पित्याचा आपल्याच मुलीवर बलात्कार; पीडितेने ऐनवेळी जबाब बदलला, तरीही ‘या’ एका कारणामुळे झाली 20 वर्षांची शिक्षा ) व्हिडीओमध्ये अनेक  विद्यार्थी आणि स्थानिक हा हल्ला पाहताना दिसत आहेत. पीडित विद्यार्थी स्कूटरवर बसलेला असताना आरोपीने चाकू काढला आणि त्वरीत चाकूने हल्ला केला. ज्यामुळे त्याचा तोल गेला. त्यानंतर आरोपी मुलगा काही विद्यार्थ्यांसोबत पळताना दिसत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या