JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / 5 रुपयांच्या बिस्किटांच्या पाकिटासाठी 10 रुपये आकारले, त्या बदल्यात दुकानदाराला मोठा दंड

5 रुपयांच्या बिस्किटांच्या पाकिटासाठी 10 रुपये आकारले, त्या बदल्यात दुकानदाराला मोठा दंड

प्रत्येक जिल्ह्यात ग्राहकांसाठी एक ग्राहक मंच तयार करण्यात आला आहे.

जाहिरात

सांकेतिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पवन कुमार, प्रतिनिधी रेवाडी, 29 जून : दुकानदार ग्राहकांकडून मालासाठी मनमानी पद्धतीने पैसे घेत असल्याचे अनेक वेळा दिसून येते. पण ग्राहकांना ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीत वस्तू विकणे, हा कायदेशीर गुन्हा आहे. एखाद्या दुकानदाराने तुमच्याशी असे केले तर लगेच ग्राहक न्यायालयात तक्रार करा. हरियाणाच्या रेवाडीमध्ये अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकाकडून जास्त शुल्क आकारल्याबद्दल न्यायालयाने दुकानदार/मार्टला मोठा दंड ठोठावला आहे. याशिवाय ग्राहकांना भरपाईही देण्यात आली आहे. आज आपण अशाच काही घटनांबाबत जाणून घेऊयात.

प्रकरण - 1 - मार्टमध्ये घेतले गेले बिस्किटांसाठी जास्त पैसे सुनील कुमार यांनी 11 नोव्हेंबर 2019 रोजी विशाल मेगा मार्टमधून बिस्किटांची दोन पाकिटे विकत घेतली. मात्र, मार्टकडून 5 रुपयांच्या बिस्किटांच्या पॅकेटसाठी 10 रुपये आकारले जात होते, त्यानंतर सुनील कुमार यांनी मार्टविरोधात ग्राहक मंचात तक्रार केली होती. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अखेर 13 जून 2023 रोजी जिल्हा ग्राहक मंच आयोगाचे अध्यक्ष संजयकुमार खंडुजा आणि ऋषिदत्त कौशिक यांनी निकाल याप्रकरणी दिला. या निकालात त्यांनी मार्टला 9 टक्के व्याजासह 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कायदेशीर प्रक्रियेत खर्च झालेली रक्कम म्हणून 50 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले.

प्रकरण - 2 - खराब सोन पापडी विकली, मग दंड भरावा लागला खराब झालेली सोनपापडी विकणे एका दुकानदाराला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी सोन पापडी विकणाऱ्या दुकानाला ग्राहक मंचाने 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. अधिवक्ता कैलाश चंद यांनी सांगितले की, रेवाडीच्या राजपाल यादवने 10 नोव्हेंबर 2022 रोजी सोन पापडीची दोन पॅकेट (450/- ग्रॅम प्रति पॅकेट) 220/- रुपयांना विकत घेतली होती. पण सोन पापडी निकृष्ट दर्जाची आहे, अशी तक्रार ग्राहकाने दुकानदाराकडे केली. मात्र, पाकीट उघडे असल्याने दुकानदाराने ते परत घेण्यास नकार दिला. त्यानंतर ग्राहकाने ग्राहक मंचात धाव घेतली. तक्रारदाराने ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार केली आणि या प्रकरणात संजय कुमार खंडुजा यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर 8 जून 2023 रोजी ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला. याप्रकरणात सोन पापडीची किंमत (रु. 220) 9 टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले, तसेच खटला खर्च म्हणून 10 हजार रुपये स्वतंत्रपणे देण्यात यावे, असे आदेश देण्यात आले. प्रकरण - 3 - कॅरीबॅगच्या नावावर 14 रुपये घेतले, पण नंतर भरावा लागला 20 हजार रुपये दंड रेवाडीच्या दीपक सैनी यांनी 3 जानेवारी 2021 रोजी विशाल मेगा मार्टमधून 1,587 रुपयांची वस्तू खरेदी केली होती. खरेदी केल्यानंतर, त्यांनी कॅरीबॅग मागितली. पण विक्रेत्याने कॅरीबॅग देण्यासाठी वेगळे 14 रुपये आकारले. नियमानुसार, वस्तू खरेदी केलेल्यांच्या सोयीसाठी कॅरीबॅग मोफत देण्याची तरतूद आहे. पण दुकानदाराने याचे उल्लंघन तर केलेच शिवाय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2011 लाही विरोध केला. दुकानदाराने ग्राहकाला प्लास्टिकची कॅरीबॅग उपलब्ध करून दिली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने 25 मे 2023 रोजी निर्णय दिला आणि विशाल मेगा मार्टला 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच याशिवाय खटल्याचा खर्च म्हणून 11 हजार रुपये देण्याचे आदेश दिले. ‘जागो ग्राहक जागो’ - अधिवक्ता कैलाश चंद यांनी सांगितले की, ग्राहकाला असे अनेक अधिकार आहेत, ज्याचा वापर करून तो मालाची गुणवत्ता तपासू शकतो. ग्राहकाला वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याचे प्रमाण, गुणवत्ता, शुद्धता, क्षमता, किंमत आणि दर्जा याबाबत माहिती घेण्याचा अधिकार आहे. मात्र, अनेक वेळा ग्राहक एक्सपायरी डेट न पाहताच वस्तू खरेदी करतो. अशा परिस्थितीत ग्राहकाला योग्य किमतीत योग्य वस्तू विकणे हीदेखील दुकानदाराची जबाबदारी आहे. पण फसवणूक झाल्यास किंवा चुकीचा माल मिळाल्यास, ग्राहक हा ग्राहक मंचाची मदत घेऊ शकतो आणि याप्रकरणी स्वत: तक्रार करू शकतो. मंचामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये ग्राहकांचे म्हणणे ऐकून त्यांना योग्य न्याय दिला जातो. प्रत्येक जिल्ह्यात ग्राहकांसाठी एक ग्राहक मंच तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकाला त्याच्या हक्कांची जाणीव असणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या