JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / 35 वर्षांच्या महिलेने 16 वर्षांच्या मुलाचे केले लैंगिक शोषण; खुलाशानंतर पतीकडून 1 लाखांची मागणी

35 वर्षांच्या महिलेने 16 वर्षांच्या मुलाचे केले लैंगिक शोषण; खुलाशानंतर पतीकडून 1 लाखांची मागणी

हा प्रकार समोर आल्यानंतर मुलगा खूप घाबरला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजगड, 4 जून: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) राजगडमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका 35 वर्षांच्या महिलेने एका 16 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केले. (Woman Arrested For Sexual Abuse Of Minor). इतकच नाही तर या गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर महिलेचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडित तरुणाला धमकी दिली आणि म्हणाले की, जर 1 लाख रुपये दिले नाही तर खोट्या केसमध्ये अडकवू. आरोपी महिलेसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी आरोपी महिला, तिचा पती आणि महिलेच्या सासू-सासऱ्यांना अटक केलं आहे. पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम  384 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर महिलेविरोधात पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजगडचे एसपी प्रदीप शर्मा यांनी सांगितलं की, महिलेने एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केले आहे. आरोपी महिला आणि पीडित एकाच गावात राहतात. 27 मे रोजी महिलेच्या पतीला याबाबत कळलं. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाकडून 1 लाख रुपये मागितले आणि सांगितलं की, जर पैसे दिले नाही तर खोट्या केसमध्ये तुरुंगात टाकीन. हे ही वाचा- भोंदूबाबाचे 3 वर्षीय बालकावर अघोरी उपचार, पोटावर चटके दिल्यानं प्रकृती गंभीर त्यांनी पुढे लिहिलं की, जेव्हा पीडित मुलाच्या कुटुंबाने 1 लाख रुपये देण्यास नकार दिला तर आरोपी महिलेचे पती आणि सासऱ्याने त्याच्या शेतीचं नुकसान केलं आणि झाडंही कापली. यानंतर पीडित मुलाने चाइल्डलाइन हेल्पलाइनशी संपर्क केला. गेल्या सोमवारी काउन्सिलर मनीष डांगी यांनी अल्पवयीन मुलाशी याबाबत बातचीत केली. डांगी यांनी सांगितलं की, मुलाला बदनामी होण्याची भीती होती. ही बाब त्याने इतर कोणासोबत शेअर केली नव्हती. जेव्हा महिलेचे कुटुंबीय अल्पवयीन मुलाच्या कुटुंबासोबत गैरव्यवहार करू लागले तेव्हा मुलाने हेल्पलाइनवर फोन केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या