गुरुग्राम, 13 ऑगस्ट : आई-मुलाचे नाते अत्यंत प्रेमाचे असते. मात्र, एका तरुणाने (21) आपल्याच विधवा आईची चाकूने अनेक वेळा भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना हरियाणातील गुरुग्राममध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवेशला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पतीच्या निधनानंतर, सोना देवी (40) हिसारमधील गढ़ी येथे तिच्या माहेरी चालली गेली होती. तसेच ती तिथे एका खासगी शाळेत वॉर्डन म्हणून काम करू लागली होती. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तिने नोकरी सोडली होती आणि ती त्याच गावात भाड्याच्या खोलीत राहत होती. तर आरोपी मुलगा प्रवेश हा सोनीपतच्या जटवाडा परिसरात राहत होता आणि तो अधूनमधून त्याच्या आईला भेटायला जायचा. 6 ऑगस्ट रोजीही तो आईला भेटायला आला होता आणि याचवेळी त्याने आईवर चाकूने वार करून तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मृतदेह खाटाखाली लपवून ठेवला होता. चार दिवसांनंतर बुधवारी खोलीच्या मालकाने दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याबाबत त्यांनी तक्रार करून पोलिसांना फोन केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सोनादेवीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान सोनादेवीचा भाऊ परविंदर याने प्रवेशवर तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. हेही वाचा - सख्या भावावर कुऱ्हाडीचा घाव, कुटुंब उद्ध्वस्त, बारामती हादरलं सेक्टर 10 ए पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याला गुरुवारी रोहतक येथून अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्रवेशला त्याच्या आईचे कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय होता. कारण त्याने तिला अनेकदा फोनवर बोलताना पाहिले होते. तर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा लपवणे) अंतर्गत प्रवेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.