JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / आधी केले शारीरिक अत्याचार मग विळ्यानं कापला गळा; आईच्या वयाच्या महिलेसह 16 वर्षांच्या मुलाचं कृत्य

आधी केले शारीरिक अत्याचार मग विळ्यानं कापला गळा; आईच्या वयाच्या महिलेसह 16 वर्षांच्या मुलाचं कृत्य

या मुलानं बदला घेण्यासाठी एका 58 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे.

जाहिरात

विकृती की मोबाईलचा दुष्परिणाम?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 06 फेब्रुवारी:  किशोरवयातील आणि नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली मुलं जास्त घातक असतात, असं म्हटलं जातं. या वयातील मुलांचा स्वत:च्या मनावर आणि रागावर अजिबात ताबा राहत नाही. त्यामुळे काहीवेळा भावनेच्या भरात त्यांच्या हातून गुन्हेदेखील घडतात. मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यातील एका 16 वर्षांच्या मुलाबाबत अशीच घटना घडली आहे. या मुलानं बदला घेण्यासाठी एका 58 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे. हनुमान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कैलाशपुरी गावात 30 जानेवारीच्या रात्री ही घटना घडली आहे. या मुलानं दोन वर्षांपूर्वी मोबाईल फोन चोरी केल्याचाही संशय आहे, असं पोलिसांनी सांगितलं. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) विवेक लाल यांनी सांगितलं की, बांधकामाधीन इमारतीत एका 58 वर्षीय महिलेचा मृतदेह असल्याची माहिती 1 फेब्रुवारी रोजी मिळाली होती. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असता अज्ञात व्यक्तीनं महिलेची निर्घृण हत्या केल्याचं आढळलं. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या शेजारी राहणार्‍या मुलाचा शोध घेतला. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, या मुलानं पीडित महिलेच्या तोंडात प्लास्टिकची पिशवी आणि कापड कोंबून तिचा आवाज बंद केला. त्यानंतर तिला ती राहात असलेल्या इमारतीच्या बांधकाम सुरू असलेल्या भागात ओढून नेलं. तिथे तिच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर विळ्याने वार केले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टलाही जखमा केल्या. ‘‘माझ्याशी मैत्री कर, मी तुला नापास होऊ देणार नाही.’’ म्हणत शिक्षकाकडून विद्यार्थीनीशी अश्लील कृत्य महिलेच्या कुटुंबीयांनी मुलावर दोन वर्षांपूर्वी मोबाईल चोरल्याचा आरोप केला होता. मुलाला त्याचा बदला घ्यायचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा दोन वर्षांपूर्वी पीडितेच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी येत असे. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर मोबाईल फोन चोरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मुलगा आणि कुटुंबात वैर निर्माण झाले होते. चोरीच्या आरोपानंतर गावात झालेल्या बदनामीमुळे मुलाला सूड घ्यायचा होता, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले. 30 जानेवारी रोजी पीडितेचा मुलगा आणि पती घरात नसताना हा मुलगा तिच्या घरात घुसला. एका खाटेवर झोपलेल्या महिलेवर त्याने कथितपणे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या महिलेनं ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्या तोंडात प्लॅस्टिक पिशवी आणि कापड कोंबलं. अयोध्येत शाळीग्राम शिळा पोहोचल्या, पण छिन्नी, हातोडा नाही चालणार; संशोधकांचा मोठा खुलासा त्यानंतर त्याने दोरी आणि वायरचा वापर करून तिच्या चेहऱ्यावर एक प्लॅस्टिकची पिशवी बांधली. तिला इमारतीच्या बांधकाम सुरू असलेल्या भागात ओढून नेलं. तिला दारवाजाला बांधून वारंवार मारहाण केली. महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्यानंतर मुलानं तिच्यावर बलात्कार केला. त्यानं पीडितेच्या डोक्यावर, हातावर, गळ्यावर आणि छातीवर विळ्याने वार केले आणि काठीनं तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत केली, अशी माहिती एएसपी लाल यांनी दिली. त्यानंतर, महिलेच्या घरात ठेवलेली एक हजार रुपये रोख रक्कम आणि दागिने घेऊन मुलानं पळ काढला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या मुलानं चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या मुलाला सध्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या), 376 (बलात्कार), 460 (रात्री घर फोडणे) 380 (चोरी) आणि 201 (गुन्ह्याचा पुरावा गायब करणं) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या