JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / नागपूर हादरलं, 16 वर्षीय मुलीचे हातपाय बांधून बलात्कार, नराधम अटकेत

नागपूर हादरलं, 16 वर्षीय मुलीचे हातपाय बांधून बलात्कार, नराधम अटकेत

धक्कादायक म्हणजे, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 25 फेब्रुवारी : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे.  पाच महिन्यापूर्वी घडलेली घटना आता समोर आली आहे. एका 31 वर्षीय युवकाने 16 वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला.  मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अत्याचारी युवकाला अटक केली. विशाल मेश्राम, असे अटकेतील युवकाचे नाव आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलं इलेक्ट्रिक बॅटरी किट;एका चार्जमध्ये 80किमी धावणार बाईक पाच महिन्यांपूर्वी पीडित मुलगी घरी एकटी होती. आरोपी विशाल हा मुलीच्या घरात घुसला. दोरीने तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पत्नीचा खून केला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली बेपत्ता असल्याची तक्रार, अखेर.. काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी मुलीच्या नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी विचारणा केली असता, आरोपी विशाल याने अत्याचार केल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर मुलीसह नातेवाइकांनी मौदा पोलीस स्टेशन गाठले. विशाल याच्याविरूद्ध तक्रार दिली. मौदा पोलिसांनी विशाल याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या