JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आठवीतील मुलाला शिक्षक वर्गातच म्हणाले 'गळफास घेऊन आत्महत्या कर..'; पुढे भयानक घडलं

आठवीतील मुलाला शिक्षक वर्गातच म्हणाले 'गळफास घेऊन आत्महत्या कर..'; पुढे भयानक घडलं

आत्महत्येआधी त्याने सुसाईड नोट लिहून त्यात संपूर्ण हकीकत सांगितली. मुलाने वडिलांना विनंती केली, की शिक्षकाला सोडू नका, त्याने अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, त्याला अटक झालीच पाहिजे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 04 जानेवारी : एका शालेय विद्यार्थ्याच्या आत्महत्येची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यातील आहे. सीधी जिल्ह्यातील पडखुरी गावातील आठवीत शिकणाऱ्या मुलाने शिक्षकाने केलेल्या अपमानामुळे गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्याने सुसाईड नोट लिहून त्यात संपूर्ण हकीकत सांगितली. मुलाने वडिलांना विनंती केली, की शिक्षकाला सोडू नका, त्याने अनेक मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, त्याला अटक झालीच पाहिजे. यासोबतच मुलाने वडिलांना दारू सोडण्याचं आवाहनही केलं. नवोदय विद्यालय चुरहाटमध्ये अमित प्रजापती हा आठवीच्या वर्गात शिकत होता. 19 डिसेंबर रोजी तो वर्गात बसला होता, त्याचवेळी एका विद्यार्थ्याने त्याच्यावर चोरीचा आरोप केला. त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल सापडला. यानंतर शिक्षक अजित पांडे यांनी वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर त्याचा खूप अपमान केला. आरोपानुसार, शिक्षकाने मुलाशी गैरवर्तन केलं आणि त्याच्या पालकांना भिकारी म्हटलं. याशिवाय शिक्षकाने त्याचा भरपूर अपमानही केला. अंजलीला 4 किंवा 12 नाही, तर 40 किलोमीटर फरफटत नेलं; सीन रिक्रिएट करताच हादरवणारा खुलासा या घटनेच्या एका दिवसानंतर, शाळेच्या व्यवस्थापनाने मुलाच्या पालकांना संपूर्ण घटनेची माहिती दिली, त्यानंतर 14 वर्षीय अमितच्या वडिलांनी त्याला शाळेतून घरी नेलं. त्याला खूप समजावलं आणि सांगितलं की जे झालं ते विसर आणि पुढे जा. पण वर्गात झालेला अपमान अमित विसरू शकत नव्हता. हा अपमान सहन न झाल्याने त्याने २ जानेवारीला गळफास घेत आत्महत्या केली. अमितचे वडील मातीपासून विटा बनवण्याचे काम करतात. अमितने सुसाईड नोटमध्ये लिहिलं… ‘नमस्कार बाबा, मला माहीत आहे तुम्ही खूप दुःखी असाल. मी हा मार्ग स्वीकारला कारण मी आतून खूप अपमानित झालो आहे. मी माझी वाईट सवय सोडू शकलो नाही. मी खूप तणावात होतो. मला माझे सर (अजित पांडे) यांचं बोलणं वारंवार आठवत होतं. बरं, मला एक सांगा, जर कधी चूक झाली असेल तर ती माफ होऊ शकत नाही का. चूक माफ करता येऊ शकते, असं मला वाटतं. हे सर्व मी अजित पांडे यांच्या सांगण्यावरून केलं. त्यादिवशी माझ्याकडून चूक झाली होती म्हणून त्यांने मला खूप वाईट शब्दात सुनावलं. धक्कादायक : पतीनं फोन तोडल्याच्या रागातून पत्नीने केली आत्महत्या! अमितने पुढे लिहिलं, ‘सर्व मुलांना खाली पाठवले आणि मला खूप सुनावलं. माझ्या आईवडिलांना भिकारी म्हटलं आणि इतर अनेक वाईट गोष्टी ऐकवल्या. विष प्राशन करून मर किंवा कुठेतरी गळफास लावून घे असं त्यांने सांगितलं. माझ्या भावाने मला नेहमीच योग्य मार्ग दाखवला. भाऊ मला नेहमी छान समजावत. माझी आई पण खूप भोळी आहे. माझी चूक झाल्यावरही त्यांनी मला सांगितले की प्रत्येकजण चुका करतो. तू वाईट वाटून घेऊ नको. बाबा, तुम्ही कधीच दारू पिऊ नका. अजित पांडेने किती आयुष्य उद्ध्वस्त केले माहीत नाही. त्याला अटक करा. मला माफ करा बाबा’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या