या महिलेनं तीन वर्षांहून अधिक काळापासून एका मुलाचा लैंगिक छळ केला. याशिवाय त्या मुलाला मद्यपी बनवलं होतं.
कल्याण, 01 फेब्रुवारी : गेल्या काही वर्षांत लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. अशा घटनांमध्ये लहान आणि किशोरवयीन मुलं, मुली बळी पडत असल्याचं चित्र आहे. मुंबईत कल्याणमध्ये अशाच प्रकारचं एक गंभीर प्रकरण उघडकीस आलं आहे. 32 वर्षांची महिला 14 वर्षांच्या मुलाचं लैंगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही महिला गेल्या तीन वर्षांपासून पीडित मुलाचं लैंगिक शोषण करत होती. याशिवाय महिलेने या पीडित मुलाला दारूचं व्यसन लावले. मुलाच्या आईने त्याचा फोन तपासला तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. कल्याणमधली एक महिला तीन वर्षांहून अधिक काळापासून एका मुलाचा लैंगिक छळ करत होती. याशिवाय त्या महिलेने मुलाला मद्यपी बनवलं होतं. पीडित मुलाच्या आईने त्याचा फोन तपासला असता, तिला त्यात अश्लील व्हिडिओ आढळून आले आणि हे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार केली आहे. (प्रेग्नंट बहिणीच्या मदतीला आलेल्या मुलीसोबत मेहुण्याकडून धक्कादायक कृत्य, अमरावती हादरलं!) मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती घायवते असं आरोपी महिलेचं नाव असून ती नाशिकची रहिवासी आहे. कीर्ती पीडित मुलाच्या आईची मैत्रीण आहे. घायवतेविरुद्ध गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण अर्थात पॉक्सो कायदा 2012ची कलम 4,8 आणि 12, तसंच बाल न्याय कायदा 2000च्या कलम 25 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसंच कीर्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कोळसेवाडी पोलिसांनी सोमवारी (30 जानेवारी) दिली. (अॅलेस डेथ, व्हॉट आय डू? हातावर लिहून 17 वर्षीय मुलाने कॉलेजच्या शौचालयात संपवलं आयुष्य) या संदर्भात मुलाच्या आईने सांगितलं, ‘माझ्या मुलाला दारू पिण्याची आणि ऑनलाइन पॉर्न व्हिडीओ पाहण्याची सवय आरोपीने लावली. त्यामुळे माझा मुलगा सतत फोन वापरत होता. तो सतत फोन वापरत असल्याने मला संशय आला. त्यानंतर मी फोन तपासला असता मला कीर्तीबद्दल अनेक गोष्टी दिसून आल्या. आरोपी आणि तिच्या पतीचे संबंध चांगले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता,’ असा आरोप मुलाच्या आईने केला. पोलिसांनी सांगितलं, की ‘आरोपीने या मुलाचा कल्याण आणि नाशिकमधल्या घरी अनेकदा लैंगिक छळ केला. कीर्ती त्यांची फॅमिली फ्रेंड असल्याचं मुलाच्या आईने सांगितलं. घायवते मुलाला सोबत घेऊन नाशिकला सुट्टीसाठी जायची आणि तिथे त्याला मारहाण करायची असंही त्यांनी सांगितलं आहे.’