JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात पोटभर जेवले अन् तब्बल 1200 पाहुणे रुग्णालयात झाले दाखल

काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात पोटभर जेवले अन् तब्बल 1200 पाहुणे रुग्णालयात झाले दाखल

कार्यालयाच्या आजूबाजूच्या अनेक रुग्णालयात 1200 पाहुण्यांना तातडीने हलवण्यात आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गांधीनगर, 5 मार्च : गुजरातमधील मेहसाणा (Mehsana Gujarat) जिल्ह्यात काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलाच्या लग्नात जेवल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Hospitalised) पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. विसनगर ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा विसनगर तालुक्यातील सावला गावात घडली. मेहसाणा पोलीस अधिक्षक पार्थराज सिंग गोहिल यांनी सांगितलं की, लग्न समारंभात जेवण झाल्यानंतर 1200 हून अधिक लोक आजारी पडले आणि त्या सर्वांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर लोकांना उलटी आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर विसनगर, मेहसाणा आणि वडनगरमधील विविध रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. हे ही वाचा- Shocking!थट्टा-मस्करीत पतीचं लिंग परिवर्तन,पत्नीचीही साथ;दोघांचही आयुष्य उद्ध्वस ्त त्यांनी सांगितलं की, लग्न समारंभात दिलेल्या जेवणाचे नमुने फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा आणि अन्न व औषध प्रशासनाकडून तपासासाठी एकत्र करण्यात आले आहेत. विसनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावला गावात काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलाचं लग्न होतं. यात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या