JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / विद्येच्या माहेरघरातून धक्कादायक बातमी! 5वी नापासाला दिलं 10वी पासचं सर्टीफिकेट, काय आहे प्रकरण?

विद्येच्या माहेरघरातून धक्कादायक बातमी! 5वी नापासाला दिलं 10वी पासचं सर्टीफिकेट, काय आहे प्रकरण?

Educational Crime: पुण्यात काही हजारांमध्ये नापास विद्यार्थ्यांना 10वी पास असल्याचं सर्टीफीकेट देत होते.

जाहिरात

प्रतिकात्मक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 4 मे : विद्येच्या माहेरघरातून राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे. काही हजारांमध्ये दहावीच्या परीक्षेचे बोगस सर्टिफिकेट मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. बोगस शाळांनंतर आता दहावी बोर्डाचे सर्टिफिकेट देणारी राज्यव्यापी टोळी सक्रिय झाली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून राज्यातील 35 तरुणांना फसवल्याचा संशय पोलिसांना आहे. काय आहे प्रकरण? एका टोळक्याने पाचवी ते दहावी वर्गातील नापास असलेल्या तरुणांना दहावी पास असलेले गुणपत्रक व दहावी बोर्डाचे सर्टिफिकेट मिळवून दिले आहे. 50 ते 60 हजार रुपये घेऊन बोर्डाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या या टोळीने आत्तापर्यंत 35 जणांना फसवल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत एकाला अटक केली आहे. वाचा - ‘तू मला आवडत नाहीस..’; पतीच्या बोलण्याने तुटलं मन, विवाहितेचं धक्कादायक पाऊल संदीप ज्ञानदेव कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अन्य 2 साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. पुण्यातील एका तरुणाला नोकरीची गरज असल्याचे ओळखून आरोपी संदीप कांबळे यांनी 60 हजार रुपयात दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्रात दिले होते. आरोपीने 60 हजार रुपयांमध्ये पाचवी नापास असलेल्या तरुणांना दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट, मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला देत होता. या प्रकरणात अनेक जण असल्याचा दावा पोलिसांनी केला असून हे सर्टिफिकेट कोणी वापरले असेल तर ते रद्द होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या