जोधपूर, 9 डिसेंबर : जोधपुरमध्ये एका सरकारी सेवा निवृत्त वृद्ध व्यक्तीला सिम अपडेट (Sim Update) करायचं कारण सांगून फसवणूक केली आहे. त्यांना निवृत्ती वेतनाचे मिळालेल्या तब्बल 10 लाखांहून अधिक रक्कम आरोपीने साफ (Crime News) केले आहेत. गूगलवर एनीडेस्क अॅप डाउनलोड करवून हा गुन्हा करण्यात आला. ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली होती. मात्र बँकेचं स्टेटमेंट (Bank Statement) काढल्यानंतर याबद्दल माहिती मिळाली. यानंतर पीडित वृद्ध प्रतापनगर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. जोधपूरमध्ये प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितलं की, कमला नेहरू नगर द्वितीय विस्तार योजना सी-103 मध्ये राहणारे राजकुमार जोशी पुत्र रामेश्वरदत्त जोशी सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्याचं एसबीआयमध्ये बँक अकाऊंट आहे. बीएसएलएनच्या सिमचा वापर करीत होते. मात्र बऱ्याच दिवसांपासून सिम वापरत नसल्यामुळे ते बंद झालं होतं. आता 3 डिसेंबर रोजी त्यांना एका नंबरवरुन मेसेज आला की, सिम बंद झालं आहे तुम्ही 24 तासात तो रिचार्ज करा, अन्यथा ब्लॉक करण्यात येईल. यावेळी त्यांनी हा मेसेज आलेल्या नंबरवर कॉल केला तर तो बंद होता. या प्रकरणात त्यांनी तीन ते चार वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फोन बंद येत होता. यांतर राजकुमार जोशी यांनी एक फोन आला व त्यांनी सिम बंद असल्याची माहिती दिली. हे ही वाचा- बनावट फेसबुक अकाउंट उघडून कुणी तुम्हाला ‘असा’ त्रास देत नाही ना? समोरील व्यक्तीने बीएसएनएलच्या कार्यालयातून बोलत असल्याचं सांगितलं आणि ऑनलाइन सिम सुरू करून देऊ असंही सांगितलं. सुरुवातील त्यांनी सिम रिचार्ज करण्यासाठी 11 रुपये टाकण्यास सांगितलं. 11 रुपयांचं रिचार्ज न झाल्याने त्याने सांगितलं की, ते गुगलवर एनिडेस्क अॅप डाऊनलोड करा. यानंतर त्यांना आपल्या बोलण्यात अडकवून बँक अकाऊंटमधून 9 लाख 39 हजार रुपये काढून घेतले. पैसे गेल्याचा मेसेज आल्यानंतर ते तातड़ीने बँकेच्या कार्यालयात मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी गेले. येथे आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, चोरांनी सर्व पैसे साफ केले होते. यांनी त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.