JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरोधात अधिक प्रभावी ठरतीये 'ही' लस; मृत्यूदरातही होतेय घट

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरोधात अधिक प्रभावी ठरतीये 'ही' लस; मृत्यूदरातही होतेय घट

कोरोना विषाणूच्या B.1.617.2 अर्थात डेल्टा व्हेरियंटने (Delta Variant) दुसऱ्या लाटेदरम्यान धुमाकूळ घातला. त्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 जून: कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस (Corona Vaccine) घेतले असतील, तर कोरोना विषाणूच्या B.1.617.2 अर्थात डेल्टा व्हेरियंटमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ फारशी येत नाही. ‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ (PHE) या संस्थेने केलेल्या ताज्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या B.1.617.2 अर्थात डेल्टा व्हेरियंटने (Delta Variant) दुसऱ्या लाटेदरम्यान धुमाकूळ घातला. त्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं जात आहे. फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या कंपन्यांच्या लशीचे दोन डोस घेतले असल्यास कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येणार नाही याची 96 टक्के खात्री आहे. तसंच ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्या लशीचे दोन डोस घेतलेले असल्यास हेच प्रमाण 92 टक्के एवढं आहे. म्हणजेच या दोन लशी या बाबतीत अनुक्रमे 96 आणि 92 टक्के प्रभावी आहेत, असं विश्लेषणातून आढळलं आहे. या लशींमुळे डेल्टा व्हेरियंटमुळे होणाऱ्या संभाव्य मृत्यूपासून किती प्रमाणात संरक्षण मिळतं, याबद्दलचं संशोधन अद्याप सुरू आहे. मात्र अन्य व्हेरियंटच्या तुलनेत संरक्षणाचं प्रमाण जास्त असेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 12 एप्रिल ते चार जून या कालावधीत डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या 14 हजार 19 रुग्णांचा अभ्यास यासाठी करण्यात आला. त्यापैकी 166 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. पब्लिक हेल्थ इंग्लंड (Public Health England) या संस्थेनेनं आधी केलेल्या संशोधनात असं आढळलं होतं, की लशीचा एकच डोस घेतला असेल, तर अल्फा व्हेरियंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरियंटवर त्याचा प्रभाव 17 टक्के कमी आहे; पण लशीचे दोन्ही डोसेस घेतले असतील, तर या फरकाचं प्रमाण खूप कमी आहे. कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ ‘ब्रिटनमधला लसीकरण कार्यक्रम (Vaccination Programme) वेगाने सुरू असून, हजारो लोकांचे प्राण त्यामुळे वाचले आहेत. दोन डोसमुळे लशीचा प्रभाव वाढतो, हे ताज्या संशोधनात पुन्हा दिसून आलं आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणं किती महत्त्वाचं आहे, हे सिद्ध झालं आहे. ज्यांनी दुसरा डोस अद्याप घेतला नसेल, त्यांनी तो घ्यावा,’ असं आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा मंत्री मॅट हॅन्कॉक यांनी सांगितलं. पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेत इम्युनायझेशन या विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. मेरी रॅम्से यांनी सांगितलं, ‘डेल्टा व्हॅरिएंटची लागण झाल्यास आणि त्याआधी लस घेतलेली असल्यास तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ फारशी येणार नाही. कोविड-19विरोधात आपल्याकडे असलेलं लस हेच सर्वांत मोठं शस्त्र आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या आणि भविष्यात उद्धवणाऱ्या संभाव्य व्हेरियंटपासून संरक्षण मिळवण्यासाठी दोन्ही डोसेस घेणं अत्यावश्यक आहे.’ एकेकाळी ठरले कोरोना हॉटस्पॉट; मुंबई, पुण्यातील या भागाने घेतला मोकळा श्वास ‘लशीमुळे हॉस्पिटलायझेशनपासून सुटका होत असल्याचा हा संशोधनाचा निष्कर्ष दिलासादायक आहे. ज्यांनी दुसरा डोस घेतला नसेल, त्यांनी तो तातडीने घ्यावा,’ असं लसमंत्री नधीम झहावी यांनी सांगितलं. दरम्यान, पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेने केलेल्या एका स्वतंत्र संशोधनात असं आढळलं आहे, की कोविड-19 लसीकरण कार्यक्रमामुळे 30 मेपर्यंत किमान 14 हजार मृत्यू रोखण्यात यश आलं असून, सुमारे 42 हजार वृद्धांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या