JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / 73 दिवसात Corona Vaccine मिळण्याचा दावा खोटा! पुण्यातून आली मोठी बातमी

73 दिवसात Corona Vaccine मिळण्याचा दावा खोटा! पुण्यातून आली मोठी बातमी

सीरम कंपनीने असे सांगितले आहे की, भारत सरकारने केवळ CoviShield तयार करण्याची आणि साठा करण्याची परवानगी दिली आहे.

जाहिरात

हे डोस एकदाच दिले तर पुरेसे आहेत की दोन वेळा द्यावे लागतील हे अजुन स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे किमान 2024 पर्यंत कोरोनाशी लढावं लागणार असून तेवढा वेळ लसिकरणासाठी लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : जगभरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सर्वच देश सध्या कोरोना लशीची वाट (Coronavirus Vaccine) पाहत आहेत. यातच पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) 73 दिवसात कोरोनाची लस देणार असल्याचा दावा करण्यात आला होता. एवढेच नाही तर ही लस राष्ट्रीय टीकाकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकार ही लस मोफत उपलब्ध करून देण्याबाबत विचार करत आहे, असे वृत्त होते. मात्र हा दावा खोटा असल्याचे सीरम कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 73 दिवसात कोरोनाची लस कोव्हिशील्ड (CoviShield) मिळणार नाही आहे. सीरम कंपनीने असे सांगितले आहे की, भारत सरकारने केवळ CoviShield तयार करण्याची आणि साठा करण्याची परवानगी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की CoviShieldच्या उपलब्धतेसंदर्भात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा खोट्या आहेत. वाचा- Corona: रशियानंतर आता ‘या’ देशानं लावला नंबर, आपत्कालीन स्थितीत 2 लशींना मंजुरी

संबंधित बातम्या

वाचा- कोरोनापासून वाचण्यासाठी 50 टक्के लोकांना दिलं होमियोपॅथी औषध, झाला वाद भारतात मोफत लस देण्याचा केला होता दावा जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी कोरोना लस शोधण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यापैकी ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca ) यांनी तयार केलेल्या लसीचे सीरम कंपनी भारतात उत्पादन करणार आहे. ही लस भारतात CoviShield या नावाने विकली जाईल. काही माध्यमांच्या वृत्तानुसार 73 दिवसात CoviShield लस बाजारपेठेत उपलब्ध होईल, असे वृत्त होते. मात्र ही बातमी खोटी असलेल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वाचा- कोणत्या प्राण्यांना कोरोनाचा किती धोका; शास्त्रज्ञांनी अखेर शोधून काढलंच CoviShield तिसऱ्या टप्प्यात CoviShield च्या क्लिनिकल चाचण्या सुरू असल्याचे सीरम कंपनीने स्पष्ट केले आहे. यात यशस्वी होण्यासाठी व लसीचे व्यावसायिक उत्पादन सर्व आवश्यक नियामक मान्यता मिळाल्यानंतरच होईल. CoviShield लसची सध्या तिसरी आणि शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच, सीरम अधिकृतपणे त्याच्या उपलब्धतेची माहिती देईल, असेही कंपनीने सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या