भोपाळ, 11 मे: कोरोनाना सारख्या महामारीच्या काळातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अशाच एका घटनेनं मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ शहर हादरलं आहे. कोरोना ड्युटीवर असलेल्या एका नर्सची छेड काढल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे हे कृत्य अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरनं केलं आहे. शहरातील शाहपुरा भागात ही घटना घडली असून पीडित नर्स आणि आरोपी एकाच हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. हेही वाचा… खड्ड्यात फेकलं नवजात अर्भक! कारण ऐकाल तर सुन्न होईल तुमचं डोकं आरोपी लग्नासाठी लागलाय मागे.. मिळालेली माहिती अशी की, दरअसल, 24 वर्षीय नर्सची छेड काढल्याप्रकरणी आरोपी मनीष नंद याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी पीडितेला मानसिक त्रास देत होता. तिला मोबाइलवर मेसेज पाठवत होता. एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असताना नर्सकडे पाहून अत्यंत घाणेरडे कमेंटही करत होता. आरोपीनं शनिवारी पीडित नर्सला अडवलं. त्याने नर्सला लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र तिनं तो फेटाळला.नंतर आरोपीनं तिची छेड काढत तिचा विनयभंग केला. पीडितेन मोठी हिम्मत दाखवून शाहपुरा पोलिसांत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हेही वाचा… नाशिकजवळ भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारा ट्रक आणि कारची धडक, 15 गंभीर दरम्यान, भोपाळ शहरात लॉकडाऊनच्या काळात महिलांची छेड काढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शाहपुरा भागात गेल्या एप्रिल महिन्यात एका बॅंकच्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.