कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली 27 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Covid-19) देशभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. मागील आठवड्यापासून दररोज कोरोनाचे 3 लाखाहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. रविवारीदेखील साडेतीन लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अशात आता काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोमवारी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या (Corona Cases in India) संख्येत किरकोळ घट नोंदवली गेली आहे. वर्ल्डोमीटरनुसार, देशात सोमवारी 3 लाख 20 हजार 435 कोरोना रुग्णांची नोंद (Corona Update) झाली आहे. तर, 2764 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारतातील कोरोना रुग्णांची मृत्यूचा एकूण आकडा 1 लाख 97 हजार 880 वर पोहोचला आहे. तर, देशात सध्या कोरोनाचे 28 लाख 82 हजार 513 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हेही वाचा - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल देशातील नव्या रुग्णसंख्येतील ही घट महाराष्ट्रामुळेही आली आहे. राज्यात सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात दररोज 60 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळत असतात. मात्र, सोमवारी 48 हजार 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, रविवारी मृतांचा आकडा 800 हून अधिक असतानाच सोमवारी मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबईमध्येही मागील चोवीस तासात 3,876 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हेही वाचा - सरण संपले पण मरण कधी संपणार ? दापोली नगरपंचायतीने घेतला हा निर्णय महाराष्ट्रात काही प्रमाणात दिलासा मिळालेला असतानाच दिल्लीमध्ये मात्र कोरोनाचा प्रकोर सुरूच आहे. राजधानीमध्ये सोमवारी कोरोनामुळे रेकॉर्ड 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात नोंदवला गेलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. सोमवारी दिल्लीमध्ये 20 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.