JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं कितपत गरजेचं? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

Covishield च्या दोन डोसमधील अंतर बदलणं कितपत गरजेचं? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेलाही वेग देण्यात येत आहे. नुकतंच कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतरही वाढवण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 जून : देशात कोरोना (Coronavirus in India) रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेलाही वेग देण्यात येत आहे. नुकतंच कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतरही वाढवण्यात आलं आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच आता मागील काही अभ्यासांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्सचं असं म्हणणं आहे, की कोरोनाचे निरनिराळे व्हेरियंट समोर आल्यानंतर आता कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतर कमी करणं योग्य ठरेल. याबाबत बोलताना शुक्रवारी निती आयोगाचे सदस्य डॉ. वी के पॉल म्हणाले, की कोविशिल्डच्या दोन्ही डोसमधील अंतरात तात्काळ कोणत्याही बदलाची गरज नाही. ते म्हणाले, की कोणालाही या बाबतीत घाबरण्याची गरज नाही. सध्या दोन्ही डोसमधील अंतरात बदल करण्याची गरज पडल्यासही हा निर्णय अत्यंत सावधगिरीनं घेतला जाईल. कोरोनामुक्त झाल्यानंतर मंदावलेली भूक, अ‍ॅसिडीटीकडे बिलकुल दुर्लक्ष नको कारण… ते म्हणाले, की आपण हे लक्षात ठेवायला हवं, की जेव्हा आपण अंतर वाढवलं, तेव्हा आपल्याला त्या लोकांसाठीच्या धोक्याचा विचार करायचा होता, ज्यांनी केवळ एकच डोस घेतला आहे. मात्र, अंतर वाढवण्यामागे असा उद्देश होता, की अधिकाधिक लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळू शकेल आणि कोरोनाविरोधातील लढ्यात थोडी अधिक मदत मिळेल. पुढच्या आठवड्यात तुमचा जिल्हा अनलॉक होणार का? पाहा काय आहे सध्याची परिस्थिती डॉ. पॉल पुढे म्हणाले, की राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट (NTAGI ) नंच लसीच्या दोन डोसमधील अंतराबाबत निर्णय घेणं योग्य ठरेल. पॉल म्हणाले, की सुरुवातीला यूकेनं 12 आठवड्यांचं अंतर ठेवलं होतं. मात्र, आपल्याकडे उपलब्ध आकड्यांनुसार आपल्याला त्यावेळी हे सुरक्षित वाटलं नव्हतं. त्यामुळे, याबाबत कोणताही निर्णय शास्त्रज्ञांकडे सोपवणं आणि त्यांच्या निर्णयाचा आदर करणंच योग्य राहील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या