ऑक्सफर्ड युनिवर्सीटीच्या अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीने दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी घेतल्यास त्याचा परिणाम दितो, डोके दुखी, सर्दी, थकवा अशी काही लक्षणं दिसायला लगातात. स्टडीनुसार एखाद्याला पहिला डोस फाइजर व्हॅक्सिन (Pfizer Vaccine) आणि नंतर दूसरा डोस एस्ट्रॉजेनेका (AstraZeneca) व्हॅक्सिनचा दिला तर, त्यांना त्रास होतो.
नवी दिल्ली 30 मे : भारतात सध्या कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. मात्र, मृतांचा आकडा अजूनही जैसे थे आहे. अशा परिस्थितीत कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सरकारकडून लसीकरण मोहिमेवर (Corona Vaccination) भर दिला जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत देशात 21 कोटीहून अधिक लसीचे डोस दिले गेले आहेत. मात्र, पुढील काही काळात लसीकरणाच्या (Corona Vaccine) पद्धतीबाबत मोठा निर्णय आणि बदल होण्याची शक्यता आहे. यानुसार लोकांना पुढील काळात मिक्स अॅण्ड मॅच या नव्या पद्धतीनं लस देण्याबाबत विचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञ सध्या याबाबत अभ्यास करत आहेत, की भविष्यात नागरिकांना मिक्स अॅण्ड मॅच पद्धतीनुसार लस कशी देता येईल. मिक्स अॅण्ड मॅच डोसचा अर्थ आहे, एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देणं. म्हणजेच पहिला डोस वेगळ्या कंपनीचा आणि दुसरा डोस वेगळा कंपनीचा. यावरील अभ्यास पूर्ण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल. कोरोनामुळे तडजोड; पैशांसाठी अविवाहित तरुणीसमोर भाडोत्री मातृत्वाचा पर्याय देशात सुरू असणाऱ्या लसीकरण मोहिमेवर नजर ठेवण्यासाठी असलेल्या कमेटीच्या सदस्यानं सांगितलं, की असं पाहायला मिळालं, की एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीची लस दिली गेली तर त्या व्यक्तीची रोगप्रतिकाशक्ती अधिक वाढत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून याबाबतच्या बातम्या समोर आल्या आहेत. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की भविष्यात मिक्स अॅण्ड मॅच पद्धतीवर विचार केला जाईल. याचा उद्देश अधिकाधिक लोकांच्या शरीरात रोगप्रतिकाशक्ती वाढवणं आहे. कोरोना रुग्णांची हेळसांड सुरूच; नदीत फेकला मृतदेह, Shocking Video Viral शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सगळं काही व्यवस्थित पार पडल्यास येत्या काही महिन्यांमध्येच लसीकरणाची ही नवी पद्धत लागू होऊ शकते. पुढील काही महिन्यात आणखी काही कंपन्यांची लस बाजारात उपलब्ध होईल. अशात या पद्धतीचा अवलंब करुन लोकांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.