चेन्नई 19 जून : कोरोना विषाणूनं जगभरात हाहाकार घातला आहे. माणसांनंतर अनेक जनावरांमध्येही कोरोना विषाणू आढळून आला आहे. सुरुवातीला जनावरांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली. मात्र, आता घातक मानला जाणारा डेल्टा व्हेरियंटदेखील (Delta Variant) जनावरांपर्यंत पोहोचला आहे. तमिळनाडूच्या वंडालूर येथील अरिनगर अन्न प्राणिसंग्रहालयातील चार कोरोनाबाधित सिंहांच्या (Lions) शरीरात हा व्हेरियंट आढळला आहे. या सिंहांचं जिनोम सिक्वेंसिंग (Genome Sequencing) केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. हेही वाचा - 3rd Wave of Coronavirus: कधी येणार कोरोनाची तिसरी लाट? तज्ज्ञांचा गंभीर इशारा एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, उद्यानाच्या उपसंचालकांनी एक निवेदन जारी केलं आहे. यात असं म्हटलं गेलं आहे, की भोपाळच्या आयसीएआर-नॅशनल उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानाकडे 29 मे रोजी सात सिंहांचे नमूने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. यातील चार सिंहांमध्ये कोरोनाचा पँगोलिन लिनियोज बी.1.617.2 व्हेरियंट आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याला डेल्टा व्हेरियंट नाव दिलं आहे. कोरोनाचा हा व्हेरियंट अधिक घातक आणि वेगानं पसरणारा आहे. हेही वाचा - एकाच हॉस्पिटलमध्ये तब्बल 87 कोरोना रुग्णांचा मृत्यू, संचालकाला अटक या प्राणिसंग्रहालयातील 9 सिंहांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याच महिन्यात 9 वर्षाची सिंहीण नीला आणि 12 वर्षाच्या पद्मनाथन या सिंहाचा मृत्यू झाला होता. विशेषतज्ञांना अशी शंका आहे, की एका व्यक्तीमुळे या सिंहाला कोरोनाची लागण झाली होती आणि यानंतर या सिंहामुळे इतर सिंहांनाही कोरोनाची लागण झाली.