JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Covid-19 New Symptom: Corona च्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर, 'या' नव्या लक्षणानं वाढवलं टेन्शन

Covid-19 New Symptom: Corona च्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर, 'या' नव्या लक्षणानं वाढवलं टेन्शन

Corona Virus New Symptom: अनेक बड्या आरोग्य तज्ज्ञांनी कोरोना मार्गदर्शक (Corona Guidelines) तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचा आग्रह धरला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 एप्रिल: देशातील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. अनेक बड्या आरोग्य तज्ज्ञांनी कोरोना मार्गदर्शक (Corona Guidelines) तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)वाढत्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. तरीही लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. वृत्तसंस्था ANI नुसार, दिल्लीतील अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर निखिल मोदी यांनी सांगितलं की, गेल्या 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. डॉ. मोदी म्हणाले की, बहुतांश घटनांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. सध्या, कोविड 19 च्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, शिंका येणे, घसा खवखवणे आणि खोकला यासारख्या सौम्य लक्षणांचा समावेश आहे. त्यांनी सांगितलं की, अलीकडे अतिसार हे कोविड लक्षण म्हणून पाहिलं जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी सूचना करताना ते म्हणाले की, लोकांनी अनिवार्यपणे मास्क घालणं आवश्यक आहे. ते म्हणाले की, ज्या वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यादृष्टीने अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

अतिसार हे कोविड लक्षण म्हणून पाहिले जाते डॉ. मोदी म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डायरियासारख्या पोटाशी संबंधित समस्या देखील पहिल्यांदाच दिसून येत आहेत. गेल्या 10 दिवसांत डायरियासारख्या आजाराशी संबंधित अनेक कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. मात्र, त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ज्या लोकांना आधीच आरोग्याशी संबंधित आजार आहेत त्यांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीटची रणनीती अवलंबवावी लागेल- पंतप्रधान मोदी बुधवारी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2927 होती. तर मंगळवारी त्यांची संख्या 2483 होती. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत पीएम मोदी म्हणाले की, संसर्गाला सुरुवातीपासूनच रोखणं हे आपलं प्राधान्य आहे आणि आपल्याला चाचणी, ट्रॅक आणि उपचार या धोरणाचा अवलंब करावा लागेल. जसे आपण आधी आलेल्या लाटांमध्ये केलं होतं. देशात Corona ची चौथी लाट सुरू झाली? एक सर्वेक्षण अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये कोरोनाची चौथी लाट (Coronavirus Fourth Wave)आणि देशातील तज्ज्ञांवरील लोकांचा विश्वास याबद्दल सांगण्यात आलं आहे. 3 पैकी 1 भारतीयांना चौथ्या लाटेबाबत विश्वास एका सर्वेक्षणात असा प्रश्न विचारण्यात आला होता की, जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू झाली असून दिल्ली-एनसीआरमध्ये कोविडची प्रकरणे (Coronavirus)सातत्याने वाढत आहेत. हे सर्व लक्षात घेता, भारतात कोरोनाची चौथी लाट कधी येईल, असे लोकांना काय वाटते? सुमारे 11,563 लोकांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. एप्रिलमध्ये चौथी लाट सुरू झाली का? त्यापैकी 29% लोकांना असं वाटतं की, 2022 मध्ये कोविडची चौथी लाट (Coronavirus Fourth Wave)येणार नाही. त्याच वेळी, 4% लोकांनी सांगितलं की पुढील 6 महिन्यांत कोविडची चौथी लाट येणार नाही. तर 34% लोकांना असं वाटत आहे एप्रिलमध्ये चौथी लाट सुरू झाली आहे. एकूणच, असे म्हणता येईल की सर्वेक्षण केलेल्या 3 पैकी 1 भारतीयांना वाटतं की कोविड-19 ची चौथी लाट सुरू झाली आहे. 55% लोकांचा भारतीय तज्ज्ञांवर विश्वास सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं की, सध्या जगभरात कोविडचे 5-7 व्हेरिएंट आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा कोरोनाची चौथी लाट येते तेव्हा ते परिस्थिती हाताळू शकतील यावर त्यांना भारतातील तज्ज्ञांवर किती विश्वास आहे? 12,609 लोकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. 55% लोकांनी सांगितलं की त्यांचा भारतातील तज्ज्ञांवर पूर्ण विश्वास आहे. 29% लोक म्हणाले की, काही प्रमाणात विश्वास आहे. तर 8% लोक असे मानतात की भारतीय तज्ज्ञ चौथ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या