नवी दिल्ली, 06 एप्रिल: कोरोना महामारी (Corona epidemic) अजून संपलेली नाही. सर्व आरोग्य संस्था अजूनही त्याच्या गांभीर्याबद्दल संशोधन करत आहेत. कोरोनाची अनेक (Several symptoms) लक्षणे सूचीबद्ध करण्यात आली आहेत. पण एक लक्षण आहे ज्याची फारशी चर्चा झालेली नाही. आता WHO नं हे लक्षण गंभीर असल्याचं वर्णन करणारा इशारा जारी केला आहे. जाणून घेऊ या कोरोनाच्या या गंभीर लक्षणाबद्दल. कोरोनाची नवीन लक्षण समोर ‘द मिरर’च्या रिपोर्टनुसार, NHS च्या ताज्या अपडेट केलेल्या यादीतून कोरोना व्हायरसचं एक लक्षण गायब आहे, मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत इशारा दिला आहे. थंडी वाजून येणं, सततचा खोकला, वास किंवा चव कमी होणे ही कोरोनाची मुख्य लक्षणे आहेत. यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं, आजारी वाटणे, थकवा, वेदना, घसा खवखवणे, डोकेदुखी, नाक वाहणे, भूक न लागणे आणि अतिसार ही लक्षणं त्यात सूचीबद्ध केली आहेत. WHO ने दिला इशारा अधिकृतपणे सूचीबद्ध नसलेले लक्षण म्हणजे भ्रम. रोग नियंत्रण केंद्र (CDC) आणि WHO या दोन्ही संस्थांनी भ्रम (गोंधळ) हे कोरोना व्हायरसचे लक्षण म्हणून सूचीबद्ध केले आहे. WHO च्या यादीनुसार, भ्रम हे ‘गंभीर लक्षण’ म्हणून सूचीबद्ध केलं गेलं आहे आणि कोणालाही याचा त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘ब्रेन फॉग’ म्हणजे काय? या भ्रमाला ‘ब्रेन फॉग’ असंही म्हटलं जातं. जे दीर्घ कोविडचे लक्षण आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे ब्रेन फॉग काय आहे? जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेमध्ये समस्या येतात तेव्हा त्याला दीर्घ कोविडचे लक्षण म्हणून ओळखलं जातं. लाँग कोविडची लक्षणे: - लक्ष नसणे - विचारात अडचण - गोंधळ - विसरणे - मानसिक थकवा जाणवणे