JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / उद्यापासून Corona लसीच्या Booster डोसला सुरुवात, खाजगी रुग्णालयासाठीही दर निश्चित; केंद्र सरकारनं दिल्या सूचना

उद्यापासून Corona लसीच्या Booster डोसला सुरुवात, खाजगी रुग्णालयासाठीही दर निश्चित; केंद्र सरकारनं दिल्या सूचना

आता 18 ते 59 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीचा (corona vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) लागू करण्याचा निर्णय सरकारने (Government) घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 एप्रिल: देशात कोरोना व्हायरसच्या (corona virus) संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी आता 18 ते 59 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीचा (corona vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) लागू करण्याचा निर्णय सरकारने (Government) घेतला आहे. बूस्टर डोस 10 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी (Union Health Secretary) शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांच्या आरोग्य सचिवांना सांगितलं आहे की, खासगी लसीकरण केंद्रांनी कोरोना लसीच्या बूस्टर डोस दरम्यान 150 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारू नये. ही कमाल 150 रुपये शुल्क कोरोना लसीच्या किंमतीपेक्षा वेगळी असेल. यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की, ज्या व्यक्तीला लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाला आहे, त्याच लसीचा बूस्टर डोसही मिळेल. बूस्टर डोससाठी कोणतीही नवीन नोंदणी करावी लागणार नाही. कोविन अॅपवर आधीच केलेल्या नोंदणीद्वारे बूस्टर डोस लागू केला जाईल. कोविड-19 चा बूस्टर डोस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी खासगी लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रात उपलब्ध असेल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. त्याच वेळी, लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं म्हटलं आहे की, पात्र लोकांसाठी त्यांच्या कोविशील्ड लसीच्या बूस्टर डोसची किंमत प्रति डोस 600 रुपये असेल.

संबंधित बातम्या

सध्या देशात कोविड लसीचे वेगवेगळे डोस एखाद्या व्यक्तीला देण्याची परवानगी नाही, याचा अर्थ बूस्टर डोस हा त्याच लसीचा असेल जो पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये देण्यात आला होता. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर म्हटलं की, कोरोनाविरुद्धची लढाई आता अधिक मजबूत होईल. आता 18 वर्षांवरील नागरिकांना 10 एप्रिलपासून खासगी केंद्रांमध्ये (खाजगी लसीकरण केंद्र) बूस्टर घेता येणार आहेत. ज्या नागरिकांना 9 महिन्यांपासून लसीचा दुसरा डोस मिळाला आहे ते पात्र असतील. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, लवकरच कोविन वेबसाइटवर यासाठी बुकिंग स्लॉटही सुरू केले जातील. किती डोस 15 वर्षे+ वयोगटातील 96% लोकसंख्येने किमान एक डोस घेतला आहे आणि 83% लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 60 वर्षांहून अधिक वयाचे लोक, आरोग्य कर्मचारी इत्यादींना 2.4 कोटी सावधगिरीचे डोस मिळाले आहेत. 12-14 वर्षे वयोगटातील, 45% किशोरांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लसीकरणाची स्थिती 12-14 वर्षे- 2.16 कोटी डोस 15-17 वर्षे- 9.69 कोटी डोस 18-44 वर्षे- 107 कोटी डोस 45-60 वर्षे- 40.44 कोटी डोस 60 वर्षांवरील 25.70 कोटी डोस

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या