JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाचा कहर सुरूच; दैनंदिन रुग्णसंख्येची 4 लाखाकडे वाटचाल, 30 लाख रुग्णांवर उपचार सुरू

कोरोनाचा कहर सुरूच; दैनंदिन रुग्णसंख्येची 4 लाखाकडे वाटचाल, 30 लाख रुग्णांवर उपचार सुरू

कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases in India) दररोज मोठी वाढ नोंदवली जात आहे आणि आता दैनंदिन रुग्णसंख्या 4 लाखाकडे वाटचाल करत असल्याचं चित्र आहे. देशात गुरुवारी कोरोनाचे 386,888 नवे रुग्ण आढळले आहेत.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 30 एप्रिल : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Covid 19) अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णसंख्येत (Corona Cases in India) दररोज मोठी वाढ नोंदवली जात आहे आणि आता दैनंदिन रुग्णसंख्या 4 लाखाकडे वाटचाल करत असल्याचं चित्र आहे. देशात गुरुवारी कोरोनाचे 386,888 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 1,87,54,984 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 30 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, गुरुवारी कोरोनामुळे 3501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आतापर्यंतची एकूण मृतांची संख्या 2,08,313 झाली आहे. बुधवारच्या आकेडवारीसोबत तुलना केल्यास मृतांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. बुधवारी चोवीस तासात 3647 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबईने आज गाठला मृत्यूचा सर्वोच्च आकडा कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असतानाच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 31,64,825 इतकी झाली आहे, हा आकडा एकूण बाधितांच्या 16.79 टक्के इतका आहे. कोरोनातून मुक्त होणाऱ्यांचा दर घटून 82.10 झाला आहे. आकडेवारीनुसार , कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 1,53,73,765 इतकी झाली आहे. तर, मृत्यू दर घटला असून तो 1.11 टक्के झाला आहे. VIDEO : मास्क लावला नाही म्हणून आत्मानंद सरस्वतींना दंड; मोदींच्या नावाने… गुरुवारी झालेल्या मृतांच्या संख्येपैकी सर्वाधिक 771 मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. यानंतर दिल्ली 395, छत्तीसगड 251, उत्तर प्रदेश 295, कर्नाटक 270, गुजरात 180, झारखंड 145, पंजाब 137, राजस्थान 158, उत्तराखंड 85 आणि मध्य प्रदेशमध्ये 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 2,08,313 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे, यातील 67,985 रुग्ण महाराष्ट्रातील होते. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 70 टक्क्याहून अधिकांचा मृत्यू इतर गंभीर आजारांमुळे झाला आहे. 28 एप्रिलपर्यंत देशात एकूण 28,44,71,979 जणांची कोरोना चाचणी केली गेली आहे. यातील 17,68,190 नमुन्यांची बुधवारी चाचणी झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या