पुण्यात गुरुवारी दिवसभरात नवे 1764 रूग्ण आढळून आलेत तर 48 जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 1188 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
मुंबई, 10 फेब्रुवारी : मुंबई (mumbai coronavirus), पुण्यात (pune coronavirus) थैमान घालणाऱ्या कोरोनानं (coronavirus) आता आपलं केंद्र बदललं आहे. आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट (corona hotspot) समोर आले आहे. तर मुंबई, पुणे, ठाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनानं आता इतर जिल्ह्यांकडे कूच केली आहे. राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार नंदुरबार, सातारा, अमरावती, नागपूर, नाशिक ही पाच ठिकाणं कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. तर विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे. अकोला, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळे आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. राज्यात 4 जानेवारीला 48,801 सक्रिय रुग्ण होते तर 3 फेब्रुवारीला 37,516 रुग्ण होते. म्हणजेच महिनाभरात ही संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. पुणे, ठाण्यासह 21 जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. पण इतर 14 जिल्ह्यात हे प्रमाण वाढलं आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात एकिकडे दिलासादायक तर दुसरीकडे चिंताजनक परिस्थिती आहे. नागपुरात रुग्ण वाढीचा दर जास्त मंगळवारी नागपुरात 379 नवीन रुग्णाची नोंद झाली असून यात 5 रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णाच्या वाढीचा टक्का 2.52 असताना नागपूरमध्ये हा दर 3.08 टक्के आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण असून काल केंद्रीय पथकाने विदर्भाचा आढावा घेतला तेव्हा नागपूरमधील वाढती कोरोनाच्या संख्या आणि उपयोजना यावर चिंता व्यक्त केली. हे वाचा - WHO कडून चीनची पाठराखण! तपासानंतर केला अजब दावा आतापर्यंत नागपूरमध्ये 1,36,377 पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली असून यात 1,28,949 रुग्ण बरे झाले आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 4,197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरकरांनी प्रशासनाच्या उपयोजनेवर नाराजी व्यक्त केली आहे. अमरावतीत पॉझिटिव्ही रेट वाढला अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. 1 फेब्रुवारी रोजी हे प्रमाण 22 टक्के होतं तर आता सोमवारी ज्या 419 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 235 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हे प्रमाण 56 टक्क्यांवर गेलं आहे. शहरातील नागरिक कोरोना नियमाचे कुठेही पालन करताना दिसत नाही. . या पार्श्वूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. विदर्भातील कोरोना आकडेवारी जिल्हे पॉझिटिव्ह रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू नागपूर 136377 128949 4197 भंडारा 13318 12880 324 गोंदिया 14260 13987 183 गडचिरोली 9389 9250 105 चंद्रपूर 23146 22661 392 वर्धा 10353 9672 312 यवतमाळ 14789 13904 437 अमरावती 23293 22162 424 अकोला 11845 10714 338 बुलढाणा 14377 13854 173 वाशीम 7242 6963 155 एकूण 278398 264995 7040 हे वाचा - वर्षभर प्रतीक्षा करण्याची गरज नाही; अवघ्या काही मिनिटांतच तयार होणार कोरोना लस कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं की, दिल्लीच्या केंद्रीय पथकाबरोबर आमची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी 10 ते 14 जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं नमूद केलं. ज्यात अमरावती अकोला याबद्दल विशेष चिंता व्यक्त केली आहे. हा अहवाल आम्ही पाहिला आहे. काही ठिकाणी सरळ आकडेवारी पाहण्यापेक्षा दशलक्ष लोकसंख्येपैकी किती याचा विचार व्हायला हवा. या ठिकाणी टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि उपचारातील प्रोटोकॉलमध्येही सुधारणा करून त्याबाबत अधिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असं या पथकानं सांगितल्याचं डॉ. ओक म्हणाले.