नवी दिल्ली, 18 मार्च: चीनमध्ये (China) सध्या कोरोनाची प्रकरणे (Corona cases) झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये 2020 नंतर सर्वात वाईट परिस्थिती असल्याचं मानलं जात आहे. तेथे गेल्या काही आठवड्यांत कोरोनाचे रुग्ण (corona patients) झपाट्याने वाढले आहेत. अशा परिस्थितीत भारतातही चिंता वाढू लागली आहे. कोरोनाची प्रकरणे (Corona cases) पाहता चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या आठवड्यात चीनच्या आरोग्य सेवेवर दबाव वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनचं झिरो कोविड धोरण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक शहरांमध्ये तात्पुरती रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, देश ‘झिरो कोविड पॉलिसी’चा अवलंब राहील. माहितीनुसार गेल्या 10 आठवड्यांत चीनमध्ये 14 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि Omicron व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. चीनच्या या लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही वाईट परिणाम होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. कोरोना चाचणीवर भर मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये कोरोना चाचणीबाबत अनेक ठिकाणी वाद सुरू आहे. याशिवाय चीनच्या कठोर ‘झिरो कोविड पॉलिसी’ अंतर्गत लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. चीनमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिलिनमध्ये रुग्णालयांमध्ये क्वारंटाईन ठेवण्यासाठी जागा संपली आहे. एका स्थानिक अधिकाऱ्यानं सांगितले की, येथे कोरोना रोखण्यासाठी केवळ 2-3 दिवसांचा वैद्यकीय पुरवठा उपलब्ध आहे. लाखो लोक घरात कैद चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक त्यांच्या घरात क्वारंटाईन झाले आहेत. ज्या प्रांतात कोरोनाचे रुग्ण जास्त येत आहेत त्या प्रांतात लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. आतापर्यंत चीनमधील 10 शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याच वेळी, आरोग्य अधिकार्यांनी इशारा दिला आहे की आणखी कडक निर्बंध लादले जातील. आता नियम अधिक कडक होणार ऑक्सफर्ड विद्यापीठातील एपिडेमियोलॉजीचे प्राध्यापक चेन झेंगमिन म्हणाले की, येत्या काही दिवसांत निर्बंध आणखी कडक केले जातील. जे संसर्ग थांबवण्यासाठी पुरेसे आहे की नाही हे दर्शवेल. वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये चीनमध्ये वृद्धांना बूस्टर डोस देण्यात आलेला नाही, असे सांगितले जात आहे. 1.7 कोटी लोकसंख्या असलेल्या शेनझेन शहरामध्ये लोकांना कठोरपणे सांगण्यात आलं आहे की, घरातील एकच सदस्य घरातील जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर येईल.