JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधीही Corona Positive, क्वारंटाइन झाल्यावर केलं Tweet

सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधीही Corona Positive, क्वारंटाइन झाल्यावर केलं Tweet

याआधी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress president Sonia Gandhi) कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 जून: प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना कोरोनाची (corona) लागण झाली आहे. याआधी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress president Sonia Gandhi) कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress general secretary Priyanka Gandhi) कालच लखनऊहून दिल्लीला परतल्या होत्या. दोन दिवसीय नव संकल्प चिंतन शिबिरासाठी त्या लखनऊला गेल्या होत्या. (Priyanka Gandhi Corona Positive ) प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं की, मला कोविडची लागण झाली आहे. माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. सर्व प्रोटोकॉल्सची काळजी घेत मी स्वतःला घरी क्वारंटाइन केलं आहे.

संबंधित बातम्या

गुरुवारी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. रणदीप सुरजेवाला यांनी असेही म्हटले होते की, यापूर्वी सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या त्यापैकी अनेकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधींना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्या कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आल्या होत्या. सुरजेवाला म्हणाले होते की, सोनिया गांधींनी स्वतःला आयसोलेट केले आहे. 8 जूनपूर्वी सोनिया गांधी बऱ्या होतील, अशी आशा सुरजेवाला यांनी व्यक्त केली. त्या दिवशी सोनियांना नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी ईडी कार्यालयात जावे लागणार आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीने (ED) समन्स बजावला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. या समन्सनुसार सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या