JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / Shocking! लशीवर विश्वास नाही; कोरोनापासून वाचण्यासाठी ती चक्क स्वतःचीच लघवी प्यायली

Shocking! लशीवर विश्वास नाही; कोरोनापासून वाचण्यासाठी ती चक्क स्वतःचीच लघवी प्यायली

कोरोना महासाथीला जवळपास एक वर्ष उलटलं, तरी लोक कोरोनापासून बचावासाठी असे विचित्र उपाय करताना दिसत आहेत.

जाहिरात

Corona

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 17 फेब्रुवारी  : कोरोनामुळे (coronavirus) संपूर्ण जगावर भीतीचे सावट आहे. अजूनही कोरोनाची भीती गेलेली नाही. कोरोनातून बरे होण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय केले जात आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हा काढा प्या, गरम पाणी प्या, या औषधांचा वापर करा अशा प्रकारचे एक ना अनेक उपाय सध्या सोशल मीडियाद्वारे सुचविले जात आहेत. लंडनमधील एक महिला अशाच प्रकारच्या एका फेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेजला बळी पडली आहे. ही महिला आणि तिची मुलं कोरोनापासून बचाव करण्यासाठी चार दिवस स्वतःचीच लघवी प्यायले. लंडनच्या हेल्थवॉच सेंट्रल हेल्थने (Healthwatch Central Health London) नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालात हे कुटुंब व्हॉट्सअ‍ॅपवरील फेक मेसेजला बळी पडल्याचं सांगितलं आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या या महिलेला आपल्या जवळच्या मित्राकडून हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज फॉरवर्ड करण्यात आला होता. यामध्ये कोरोनातून बरे होण्यासाठी स्वत:ची लघवी प्या असं सांगण्यात आलं होतं. मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे महिला स्वतःची लघवी प्यायली. शिवाय तिनं मुलांनाही तसं करायला सांगितलं. हे वाचा -  ठरलं! सर्वसामान्यांसाठी या दिवशी बाजारात उपलब्ध होणार कोरोना लस मिळालेल्या वृत्तानुसार, ही महिला कोरोना लशीवर विश्वास ठेवत नाही. या महिलेने WCHL ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘तिला कोरोनावरील लशीवर अजिबात विश्वास नाही पण त्याऐवजी तिला कोरोनावरील पारंपारिक उपचारांवर विश्वास आहे.’ त्यामुळे हा मेसेज येतात त्याची कोणतीही शाहनिशा तिनं केली नाही. हे वाचा -  पुण्यात नवे CORONA HOTSPOTS; पुणेकरांनो सांभाळा नाहीतर… कोरोनाच्या काळात फेक न्यूज आणि अफवांना उधाण आलं होतं. कॉर्नेल युनिव्हर्सिटीने या काळात केलेल्या संशोधनानुसार,   अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनाबाबत अफवा आणि फेकन्यूज पसरवण्यामध्ये आघाडीवर होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या