JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / सर गंगाराम रुग्णालयातील 25 रुग्णांचा मृत्यू तर 60 गंभीर, 2 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक

सर गंगाराम रुग्णालयातील 25 रुग्णांचा मृत्यू तर 60 गंभीर, 2 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक

सर गंगाराम रुग्णालयात मागील 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 60 गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आहे. ऑक्सिजनची (Oxygen) तात्काळ गरज असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 एप्रिल: देशाची राजधानी दिल्लीमध्येही (Delhi) कोरोनामुळे (Corona virus) अतिशय गंभीर परिस्थिती असल्याचं चित्र आहे. अशात आता सर गंगाराम रुग्णालयातून आणखी एक बातमी समोर आली आहे. या रुग्णालयात मागील 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 60 गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आहे. रुग्णालयाकडून पाठवण्यात आलेल्या संदेशात ऑक्सिजनची तात्काळ गरज असल्याचं सांगण्यात आलं आहे. रुग्णालयात काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन (Oxygen) शिल्लक आहे. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, व्हेंटिलेटर आणि बायलेवल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (BiPAP) व्यवस्थित काम करत नाहीये. सलग दुसऱ्या दिवशी देशात 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण; 10 दिवसांत 15000+ मृत्यू काही दिवसांपूर्वीच गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले होते. यातील पाच डॉक्टरांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. तर, इतर डॉक्टर होम आयसोलेशनमध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, यातील बहुतेक डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करणारे होते. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सर्व डॉक्टरांमध्ये सौम्य लक्षणं होती आणि कोणीही गंभीर नव्हतं. कोविड रुग्णांना निकृष्ट जेवण देणाऱ्या कंत्राटदाराला शिवसेना आमदाराने सुनावले   दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णलायांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आणि ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. गुरुवारीदेखील याठिकाणी कोरोनाचे 26,169 नवे रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये मागील दहा दिवसांमध्ये कोरोनामुळे 1,750 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत 9,56,348 जण कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. तर मृतांचा आकडाही 13,193 वर पोहोचला आहे. बुधवारी दिल्लीत 72,208 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शहरात आतापर्यंत 8.51 लाख हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर, 91,618 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या