JOIN US
मराठी बातम्या / करिअर / तुमचीही नोकरी गेलीये का? मग अजिबात टेन्शन घेऊ नका! आधी 'या' गोष्टी ठेवा लक्षात; लगेचच मिळेल दुसरा जॉब

तुमचीही नोकरी गेलीये का? मग अजिबात टेन्शन घेऊ नका! आधी 'या' गोष्टी ठेवा लक्षात; लगेचच मिळेल दुसरा जॉब

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमची नोकरी गेल्यानंतर (What to do If you lost job) तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया.

जाहिरात

लगेचच मिळेल दुसरा जॉब

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जुलै: कोरोनाकाळात सर्वच लोकांचे अक्षरशः हाल झालेत. कोणाचा व्यवसाय बुडाला, कोणाची नोकरी (latest Jobs) गेली तर कोणी कर्जबाजारी झाले. यात सर्वाधिक प्रमाण होतं ते म्हणजे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांचं. ऐन कोरोनाकाळात नोकरी गेली, बाहेर सगळं बंद आता नोकरी शोधणार कशी? (How to search Jobs) हाच यक्षप्रश्न कर्मचाऱ्यांपुढे उभा होता. अजूनही काही कर्मचाऱ्यांना नोकरी मिळण्यात (How to get Jobs) अडचणी येत आहेत. जर तुमचेही असेच काही हाल असतील तर हे बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुमचीही नोकरी गेली असेल तर चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुमची नोकरी गेल्यानंतर (What to do If you lost job) तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया. घाबरून जाऊ नका साहजिकच, तुम्ही तुमची नोकरी गमावल्यास, तुमच्यावर पैशाशी संबंधित खूप दबाव असेल. खराब आर्थिक परिस्थिती तुम्हाला तणावात टाकू शकते. पण जर तुमचा स्वतःवरचा ताबा सुटला तर तुमची ही मानसिक स्थिती नवीन नोकरीच्या मुलाखतीदरम्यानही दिसून येईल. त्यामुळे तुमच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा. कंपनीचा कॉल येण्याची वाट न पाहता सक्रियपणे नोकरी शोधा. Indian Army मध्ये भरती व्हायचंय ना? मग द्या NDA परीक्षा; इथे मिळेल A-Z माहिती

कर्जदारांना टाळण्याचा प्रयत्न करू नका

जर तुम्ही कर्ज घेतले असेल आणि नोकरी गमावल्यामुळे तुम्हाला EMI भरता येत नसेल, तर तुम्हाला कर्जदारांपासून पळून जाण्याची गरज नाही. यासाठी, तुम्ही बँकेला विनंती करून तुमच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार ईएमआय पुन्हा तयार करू शकता. जर तुम्ही विश्वासार्ह ग्राहक असाल तर बँक तुमच्या विनंतीचा नक्कीच विचार करेल. सेविंग्स गमावू नका कोणत्याही किंमतीत, तुम्ही तुमच्या वृद्धापकाळासाठी साठवलेल्या पैशाची उधळणी करू नका. कारण नोकरी मिळाल्यानंतर लगेचच ही रक्कम पुन्हा करणे खूप कठीण होईल. ती रक्कम खंडित केल्याने, तुम्ही भविष्यात गुंतवणुकीची संधी देखील गमावाल. तुमच्या कौशल्याशी तडजोड करू नका बळजबरीने तुमच्या कौशल्य आणि पगारात तडजोड करू नका. खूप कमी पगार स्वीकारणे हा अजिबात योग्य पर्याय नाही. यामुळे तुमचा पगार वाढण्यास पुन्हा बराच वेळ लागेल. त्यामुळे कोणतीही नोकरीची ऑफर कोणतीही अट आणि विचार न करता लगेच स्वीकारली जावी असे नाही. Plasticला पर्याय आला, सहजपणे विकल्या जातील ‘या’ वस्तू, होईल मोठी कमाई

तुमच्या बॉसबद्दल वाईट शब्द बोलू नका

तुम्हाला काढून टाकण्याचे कारण काहीही असो, तुमच्या बॉसबद्दल आणि कंपनीबद्दल वाईट शब्द बोलू नका. तुम्ही जे बोललात ते इकडे तिकडे जाऊ शकते. यामुळे तुम्हाला भविष्यात नोकरी मिळणे कठीण होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या