JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Vardhini Mahila Bachatgat : वर्धा जिल्ह्याच्या वर्धिनी महिला बचतगटाचा जगात डंका, 54 वस्तूंची ॲमेझॅानवर होतेय विक्री

Vardhini Mahila Bachatgat : वर्धा जिल्ह्याच्या वर्धिनी महिला बचतगटाचा जगात डंका, 54 वस्तूंची ॲमेझॅानवर होतेय विक्री

वर्धिनी हा जिल्हा ब्रॅंड असून त्यांची 54 उत्पादने ॲमेझॅानवर (amazon) उपलब्ध आहेत. जिल्ह्यात बचतगटांच्या महिलांद्वारे उत्पादीत 212 प्रकारची उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. (Vardhini Mahila Bachatgat)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 12 मे : वर्धा जिल्ह्यातील (wardha) वर्धिनी महिला बचतगटाकडून (Vardhini Mahila Bachatgat) जिल्हा वार्षिक योजनेतून 60 लाख रुपये खर्च करून वर्धिनी विक्री केंद्र बांधण्यात आले आहे. वर्धिनी हा जिल्हा ब्रॅंड असून त्यांची 54 उत्पादने ॲमेझॅानवर (amazon) उपलब्ध आहेत. जिल्ह्यात बचतगटांच्या महिलांद्वारे उत्पादीत 212 प्रकारची उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. या वर्धिनी केंद्राचा लाभ 228 बतचगट व त्यातील 1 हजार 28 महिला सदस्यांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी होणार आहे.

या जिल्ह्यात महिला उद्योजिकांमध्ये फार मोठी चळवळ निर्माण झालीय. अशीच केंद्र प्रत्येक तालुक्यात उभे राहिली पाहिजेत व त्यासोबतच घराघरांत महिला उद्योजिका (women businessman) निर्माण झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे वर्धिनी बचत गटाचे उद्दिष्ट आहे. या बचतगटाकडून विविध प्रकारच्या वस्तू विक्री केल्या जातात. यामध्ये विशेष गृहउपयोगी वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. पापड, लोणची, चटणी, जवस, तीळ, साबुदाणा पापड, रवा पापड, त्या सोबतच खादीच्या कापड पिशव्या, सजावटीसाठी लागणारे साहित्य अशा सर्व प्रकारच्या वस्तू या केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. (Vardhini Mahila Bachatgat) सध्या प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असल्याने गृहपयोगी लागणाऱ्या वस्तू घरोघरी पोहचल्या पाहिजेत या उद्देशाने हा उपक्रम महिलांनी हाती घेतला होता. दरम्यान  या केंद्राचे उद्घाटन मागच्या दोन दिवसांपुर्वी जिल्हा पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मार्गदर्शन केलं. यावेळी बचतगटांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरावर विक्री केंद्र सुरु करण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. बचतगटांना खेळते भांडवल उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असे मंत्री सुनील केदार (minister sunil kedar) यांनी म्हणाले. यावेळी खासदार तडस म्हणाले की, बचतगटाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना नवीन आर्थिक ऊर्जा देण्याचे काम होत आहे. गटांच्या उत्पादीत मालाला चांगली बाजारपेठ मिळाली पाहिजे, असे खासदार तडस म्हणाले. खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक अनुश्री वानखडे, जिल्हा व्यवस्थापक मनीष कावळे, सौरभ निनावे आदी उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या