JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Vastu tips for career : घरबसल्या येतील ड्रीम जॉब्सच्या ऑफर; नोकरीसाठी करा हे सोपे उपाय

Vastu tips for career : घरबसल्या येतील ड्रीम जॉब्सच्या ऑफर; नोकरीसाठी करा हे सोपे उपाय

वास्तुशास्त्रानुसार राहत्या घरात काही उपाययोजना केल्या, तर तुम्हाला हवी तशी नोकरी मिळू शकते.

जाहिरात

आधी हे वाचा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जुलै : बेरोजगारीचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे (Corona) सर्व क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना आपली नोकरी/रोजगार गमवावा लागला. त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण अधिक वाढलं आहे. एकीकडे नोकरी (Jobs) गमावलेले तरुण आणि दुसरीकडे नुकतंच शिक्षण पूर्ण केलेले तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. प्रत्येकाच्या मनात नोकरीविषयी विशिष्ट अशी कल्पना असते. भरपूर पगार, सुविधा मिळाव्यात आणि उत्तम करिअर (Career) व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं; पण सर्वांना या गोष्टी मिळतातच असं नाही. पण वास्तुशास्त्रानुसार (Vastu shastra) राहत्या घरात काही उपाययोजना केल्या, तर ड्रीम जॉब (Dream Job) मिळू शकतो. जीवनाच्या एका टप्प्यावर मनासारखी नोकरी न मिळणं, आर्थिक प्रगती न होणं यांमुळे अनेक जण व्यथित होतात. अशा वेळी काही व्यक्ती ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घेतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या रचनेत, वस्तू ठेवण्याच्या जागेत काही चूक झाली असेल, तर नोकरीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी अगदी सोप्या उपाययोजना केल्यास या समस्या नक्कीच सुटू शकतात. हे वाचा -  चिमुटभर मिठाचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील, वास्तुशास्त्रातील हे उपाय आहेत खास झी न्यूज हिंदी ने दिलेल्या वृत्तानुसार घराच्या ब्रह्मस्थानी अर्थात मध्यभागी जड वस्तू, सामान किंवा फर्निचर ठेवलेलं असेल तर त्यामुळे करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ब्रह्मस्थानी अशा वस्तू ठेवल्या असतील तर त्यांची जागा बदलावी आणि ही जागा स्वच्छ, तसंच मोकळी ठेवावी. नोकरी मिळण्यात किंवा पदोन्नती (Promotion) होण्यात अडचणी येत असतील, तर बेडरूममध्ये पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा. पिवळ्या रंगामुळे कुंडलीतला गुरू ग्रह मजबूत होतो. यामुळे नशिबाची साथ मिळू लागते. तसंच करिअरवरही याचा सकारात्मक परिणाम दिसू लागतो. ज्यांच्या कुंडलीतल्या ग्रहदोषामुळे करिअरमध्ये वारंवार अडथळे येत असतील, त्यांनी एकमुखी किंवा दशमुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी, अडथळे दूर होतील. नोकरीसाठीच्या इंटरव्ह्यूमध्ये (Interview) वारंवार अपयशी ठरत असाल, तर पुढच्या वेळी इंटरव्ह्यू द्यायला जाताना लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवावा. शक्य असल्यास लाल रंगाचे कपडे परिधान करून इंटरव्ह्यूला जावं. यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढते. तसंच घरातून बाहेर पडण्यापूर्वी श्री गणपतीची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद खावा. हा उपाय यशदायी ठरू शकतो. हे वाचा -  Vastu Tips: घरातील वास्तूदोष घालवणे आहे शक्य; या उपायांनी मिळेल धन आणि सुख-शांती मनासारखी नोकरी मिळत नसेल, तुम्ही बेरोजगार असाल तर घरातल्या उत्तर दिशेच्या (North) भिंतीवर आरसा लावावा. तुम्ही पूर्णपणे आरशात दिसाल इतका तो मोठा असावा. यामुळे लवकर मनासारखी नोकरी मिळू शकते. (सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य वास्तूशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत यांची हमी देत नाही किंवा समर्थन करत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या