JOIN US
मराठी बातम्या / करिअर / UPSC Recruitment 2021: केंद्राच्या या विभागात परीक्षा न देता व्हाल अधिकारी; पगारदेखील लाखांमध्ये

UPSC Recruitment 2021: केंद्राच्या या विभागात परीक्षा न देता व्हाल अधिकारी; पगारदेखील लाखांमध्ये

UPSC ची परीक्षा देऊन भारत सरकारच्या विविध विभागांत अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : UPSC ची परीक्षा देऊन भारत सरकारच्या विविध विभागांत अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. (UPSC Recruitment 2021) UPSC ने प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, जॉइंट असिस्टंट डायरेक्टर, सीनिअर असिस्टंट कंट्रोलर माइन्स या पदांच्या (UPSC Recruitment 2021) भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना (UPSC Recruitment 2021) अर्ज करायचा आहे त्यांनी UPSC च्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या पदांसाठी (UPSC Recruitment 2021) अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2021 आहे.

उमेदवार https://www.upsc.gov.in/ या लिंकवर क्लिक करून पदांसाठी (UPSC Recruitment 2021) अर्ज करू शकतात. त्याचबरोबर https://www.upsc.gov.in/sites/default/files/Advt - 16 - 2021 - engl - 121121.pdf या लिंकवर क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशनही (UPSC Recruitment 2021) बघू शकता. याच भरती प्रक्रियेअंतर्गत (UPSC Recruitment 2021) 36 पदं भरली जातील.

UPSC Recruitment 2021 साठी महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख - 2 डिसेंबर 2021

UPSC Recruitment 2021 साठी पदांची सविस्तर माहिती

प्रोफेसर - (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) - 1 पद

असोसिएट प्रोफेसर - (इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग) - 3 पदं

असोसिएट प्रोफेसर - (कम्प्युटर इंजिनिअरिंग/ माहिती प्रसारण इंजिनीअरिंग) - 3 पदं

असिस्टंट प्रोफेसर (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग) - 7 पदं

असिस्टंट प्रोफेसर - (कम्प्युटर इंजिनिअरिंग/ सूचना औद्योगिक इंजिनीअरिंग) – 5 पदं

जॉइंट असिस्टंट डायरेक्टर - 3 पदं

डेप्युटी डायरेक्टर - 6 पदं

इंडियन ब्युरो ऑफ माइन्समध्ये सीनिअर कंट्रोलर ऑफ माइन्स - 8 पदं

UPSC Recruitment 2021 साठी पात्रता -

प्रोफेसर - (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) - इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा मास्टर डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण त्याचबरोबर पीचडी आणि शिक्षण, संशोधन आणि /किंवा नोकरीत दहा वर्षांचा अनुभव आवश्यक. यामध्ये कमीत कमी पाच वर्षं तरी सहायक प्रोफेसर/ रीडर किंवा समकक्ष ग्रेडमध्ये काम केलेलं असावं.

असोसिएट प्रोफेसर ( इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग) - कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मास्टर्स ऑफ इंजिनीअरिंग किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण किंवा समकक्ष पदवीसोबत इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंगमध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी आवश्यक

असिस्टंट प्रोफेसर - (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग) - उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेची प्रथम श्रेणी किंवा समकक्ष बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि मास्टर ऑफ इंजिनीअरिंग किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी आवश्यक

असिस्टंट प्रोफेसर (कम्प्युटर इंजिनीअरिंग / माहिती तंत्रज्ञान इंजिनीअरिंग) - कोणतंही मान्यताप्रात विद्यापीठ किंवा संस्थेमधून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंग किंवा मास्टर ऑफ टेक्नोलॉजी, बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी किंवा मास्टर ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणी किंवा समकक्षच्यासोबत कम्प्युटर इंजिनीअरिंग / माहिती प्रसारण इंजिनीअरिंग किंवा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी उत्तीर्ण आवश्यक

जॉइंट असिस्टंट डायरेक्टर - उमेदवारांनी कोणतंही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी. टेक. किंवा बी. ई. किंवा बी. एससी. केलेलं असणं आवश्यक.

डेप्युटी डायरेक्टर - कोणतंही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून अर्थशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा गणित किंवा कॉमर्स किंवा मानसशास्त्र किंवा समाजकार्य किंवा लोक प्रशासन किंवा व्यवसाय प्रशासनामध्ये मास्टर्स डिग्री आवश्यक

हे ही वाचा- इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्समध्ये भरती; बघा पगार

UPSC Recruitment 2021 साठी वयोमर्यादा -

प्रोफेसर (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) - 53 वर्षं

असोसिएट प्रोफेसर (इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार इंजिनीअरिंग) - 50 वर्षं

असोसिएट प्रोफेसर (कम्प्युटर इंजिनीअरिंग/ सूचना प्रसारण इंजिनीअरिंग ) - 50 वर्षं

असिस्टंट प्रोफेसर (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन) - 35 वर्षं

सहायक प्रोफेसर (कम्प्युटर इंजिनीअरिंग/ माहिती तंत्रज्ञान (information technology)इंजिनीअरिंग) - 35 वर्षं

संयुक्त सहायक निर्देशक - 30 वर्षं

डेप्युटी डायरेक्टर - 40 वर्षं

इंडियन ब्युरो माइन्समध्ये सीनिअर असिस्टंट कंट्रोलर ऑफ माइन्स 40 वर्षं

UPSC Recruitment 2021साठी अर्जाची फी -

उमेदवारांना अर्जासाठी 25 रुपये (एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी/ महिला यांना सूट) भरावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या