दिल्ली, 24 जून : कोणत्याही गोष्टीमध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये कधीच यश मिळत नाही. कधी कधी एखादं ध्येय गाठण्यासाठी वारंवार अपयशाचा सामना करावा लागतो. अपयशामुळे निराश (Frustrated by Failure) होऊन प्रयत्न सोडणारे बरेच लोक असतात. मात्र स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपलं ध्येय न सोडण्याचा सल्ला आयपीएस ऑफिसर अंकिता शर्मा (IPS Ankita Sharma) यांनी दिलेला आहे. 2018साली अंकिता शर्मा IPS ऑफिसर झाल्या आहेत. त्यांनी आपला हा अनुभव UPSCची परीक्षा परीक्षा (UPSC Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलेला आहे.अंकिता शर्मा यांनी ट्विटरवर (Twitter) आपला अनुभव शेअर केलेला आहे. ( तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच ) ‘त्या सांगतात प्रत्येक विद्यार्थी ज्यांनी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र अपयशाला घाबरतात. UPSCचे विद्यार्थी जे परीक्षा देणार आहेत आणि देशाची सेवा करण्याचं स्वप्न बघत आहेत. त्या प्रत्येक विद्यार्थ्यांने मला मेसेज करावा’. म्हणजे अंकिता शर्मा या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तयार आहे.
अंकिता शर्मांनी अपयशाला न घाबरता परीक्षा देण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणतात अपयशाशिवाय कधीच यश मिळत नाही. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अपयशी होतो. मागे आल्यावर माणूस आणखीन जोरात पुढे उडी घेतो. यशस्वी व्हायचं असेल तर, अपयशामुळे निराश होऊ नका. ( चहा विकणाऱ्या वडिलांचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला IAS; देशल दान यांची प्रेरणा ) उलट महान व्यक्तींच्या आत्मकथा वाचा. त्यांनी कसं यश मिळवलं याचा अभ्यास करा. यश आणि अपयश कधीच स्थिर नसतं. स्वतःचा आत्मविश्वास कधीच गमावू नका. अंकिता शर्मा यांचा सल्ला खरोखर विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे.