JOIN US
मराठी बातम्या / करिअर / IASसाठी सोडलं लाखोंचं पॅकेज; गुंजन सिंह यांनी घेतला गरीबांसाठी देश सेवेचा निर्णय

IASसाठी सोडलं लाखोंचं पॅकेज; गुंजन सिंह यांनी घेतला गरीबांसाठी देश सेवेचा निर्णय

IAS ऑफिसर गुंजन सिंह (IAS Officer Gunjan Singh) यांना गरीब विद्यार्थ्यांना शिकवत असताना इजिनियरिंग सोडून देश सेवा करण्याची प्रेरणा मिळाली.

जाहिरात

इंटर्नशिप करत असताना गुंजन सिंह आजूबाजूच्या गावांमध्ये गरीब मुलांना शिकवण्यासाठी जात होत्या.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट :  IAS ऑफिसर गुंजन सिंह (IAS Officer **Gunjan Singh)** उत्तर प्रदेशच्या कानपूर (Kanpur, Uttar Pradesh) मधील राहणाऱ्या आहेत. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण तिथेच झालं. इंजिनीयर (Engineering) होणं त्यांचं स्वप्न होतं त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत करून जेईईची परीक्षाही (JEE Exam) पास केली आणि आयआयटी रूडकीमध्ये (IIT Roorkee**)** ऍडमिशन मिळवलं. सुरवातीच्या काळात त्यांनी IIT पूर्ण करून चांगली नोकरी करण्याचा निश्चय केला होता. मात्र, इंटर्नशिप करत असताना गुंजन सिंह आजूबाजूच्या गावांमध्ये गरीब मुलांना शिकवण्यासाठी जात होत्या. तिथल्या मुलांची परिस्थिती पाहूनच गुंजन यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. ( ऐकून आश्चर्य वाटेल, या देशात बदकाच्या एका पिसासाठी मोजावे लागतात हजारो रुपये ) UPSC परीक्षेमध्ये त्यांना सहजपणे यश मिळालं नाही. त्यांनी 3 वेळा प्रयत्न केल्यानंतर IAS ऑफिसर होण्याची संधी गुंजन यांना मिळाली. त्या IIT इंजिनीयर असल्यामुळे त्यांना लाखोंचं पॅकेज असणारी नोकरी मिळाली होती. पण, नोकरी सोडून त्यांनी यूपीएससी परीक्षा (UPSC Exam) देण्याचा निर्णय घेतला. ( अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर ) दोन प्रयत्नांमध्ये अपयश आल्यानंतर त्या काहीशा निराश झाल्या मात्र, या काळात त्यांच्या कुटुंबाने त्यांची साथ सोडली नाही. त्यांना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा दिली. कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी तिसऱ्यांदा प्रयत्न केला आणि यावेळी 16 रँक मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. ( बिहारची ‘सुपर कॉप’ नवज्योत सिंग IPS होण्यासाठी सोडली डॉक्टरी ) गुंजन सिंह यांच्या मते UPSC  परीक्षेची तयारी पूर्ण प्लॅनिंगने केली तरच यश मिळतं. अभ्यासाची आखणी केली नाही तर, अभ्याक्रम पूर्ण होत नाही आणि रिविजनची संधी मिळत नाही .त्यामुळे गुंजन अभ्यास करताना आठवड्याचा प्लॅन तयार करत असत. याशिवाय गुंजन यांच्या सल्ल्यानुसार आपल्यामधील कमतरता शोधून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करायला हवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या