JOIN US
मराठी बातम्या / करिअर / शिक्षा नव्हे शिक्षण महत्त्वाचं! फाशीची शिक्षा सुनाववेल्या कैद्याने पास केली SSC परीक्षा; फर्स्ट क्लास घेऊन उत्तीर्ण

शिक्षा नव्हे शिक्षण महत्त्वाचं! फाशीची शिक्षा सुनाववेल्या कैद्याने पास केली SSC परीक्षा; फर्स्ट क्लास घेऊन उत्तीर्ण

अशाच एका फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या एका कैद्याने दहावीची बोर्डाची परीक्षा (Prisoner passed 10th class exam) ही फर्स्ट क्लासमध्ये पास (UP board SSC Exam result 2022) केली आहे.

जाहिरात

हा कैदी असला तरी त्याच्या शिक्षणाच्या जिद्दीची दाद द्यावी तितकी कमी आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून: अनेकदा शिक्षणाचा अभाव आणि घरची आर्थिक परिस्थिती यामुळे अनेकजण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. यामध्ये अनेकदा गंभीर गुन्हे (Crime news) घडतात. न्यायालालाकडून कठोर शिक्षा सुनावली जाते. मात्र अशा कैद्यांनाही स्वतःसाठी काही करण्याची इच्छा असते. अशाच एका फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या एका कैद्याने दहावीची बोर्डाची परीक्षा (Prisoner passed 10th class exam) ही फर्स्ट क्लासमध्ये पास (UP board SSC Exam result 2022) केली आहे. त्यामुळे हा कैदी असला तरी त्याच्या शिक्षणाच्या जिद्दीची दाद द्यावी तितकी कमी आहे. एका पाच वर्षाच्या निरपराध मुलीच्या हत्येप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मनोज नावाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली होती. शिक्षेनंतर, मनोजने तुरुंगातूनच दहावीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला आणि शनिवारी आलेल्या यूपी बोर्डाच्या निकालानुसार, मनोजने दहावी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केली. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाने (UPMSP) या शनिवारी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले. जाहीर झालेल्या निकालांनुसार, कैदी मनोज यादवने 64 टक्के गुण मिळवून 10वीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. SSC Result 2022 : 43 वर्षांचे वडील 10 वी च्या परीक्षेत पास तर मुलगा झाला नापास

शिक्षा सुनावण्यापूर्वी मनोजने तुरुंगातच दहावीचा फॉर्म भरला होता, मात्र फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने वाचन आणि लेखन पूर्णपणे सोडून दिले होते. कैदी मनोज यादव हा कोतवाली कलान भागातील रहिवासी आहे. त्याने 28 जानेवारी 2015 रोजी पाच वर्षांच्या निष्पाप अनमोलची गोळ्या घालून हत्या केली, ज्यासाठी त्याला शाहजहानपूर न्यायालयाने 24 नोव्हेंबर 2021 रोजी फाशीची शिक्षा सुनावली.

कारागृह प्रशासनानं अभ्यासात केली मदत तुरुंगातील अनेक अधिकाऱ्यांनी त्याला परिश्रमपूर्वक अभ्यास करण्यास प्रवृत्त केले, त्यानंतर त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. मनोज दहावीच्या प्रत्येक विषयाच्या परीक्षेला बसला, परिणामी मनोजने 64 टक्के गुण मिळवून प्रथम विभागात उत्तीर्ण झाला. पांडे यांनी मनोजला अभ्यासासाठी पुस्तके पुरवल्याचे सांगितले. यासोबतच त्यांची वेळोवेळी भेट घेऊन अभ्यासासंबंधीची माहितीही देण्यात आली. NEET UG Exam 2022: डॉक्टर व्हायचंय ना? मग अवघ्या एका महिन्यात असा करा अभ्यास

शिक्षा नाही तर शिक्षण महत्त्वाचं

अनेकदा शिक्षा सुनावलेले कैदी हे कारागृहातूनच अभ्यास करत असतात. काही दिवसांपूर्वी अरुण गवळी यानेही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. शिक्षा जरी असली तरी शिक्षण महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे कारागृह प्रशासन अशा कैद्यांना वेळोवेळी मदत करतात ही कौतुकास्पद बाब आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या