टॉप पार्ट टाइम जॉब्स
मुंबई, 22 ऑक्टोबर: दिवाळीचे दिवस आहेत. काहींच्या घरी पैशांची कमी चाहिये तर काही जणांच्या घरी मात्र लक्ष्मी नाहीये. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून किंवा शिक्षण सुरु असतानाच पार्ट टाइम जॉब करावे लागतात. होतकरू विद्यार्थी यातून मार्ग काढत शिक्षणासोबतच नोकरी करण्याचा पर्याय निवडतात. पण पार्ट टाइम नोकरी करावी तरी कोणती? कोणती नोकरी केल्यामुळे पैसे जास्त मिळू शकतील? असे प्रश्न विद्यार्थ्यंना पडत्तात. याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया टॉप पार्ट टाइम जॉब्सबद्दल. ज्यामुळे तुमच्याकडे दिवाळीत थोडे का होईन पण पैसे येतील. Coffee किंवा TEA शॉप आजकाल बरेच हाय प्रोफाइल कॉफी शॉप्स आणि टी शॉप्स लोकप्रिय आहेत. अशा ठिकाणी काम करण्याचं विद्यार्थ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. अशा ठिकाणी फक्त 5 ते 6 तासांच्या शिफ्टमध्ये काम करून 6000 ते 10000 रुपये मिळवता येतात. त्यामुळे हा पार्ट टाइम जॉबचा एक उत्तम पर्याय आहे. महिन्याचा तब्बल 60,000 रुपये पगार पात्रता फक्त ग्रॅज्युएट; ‘या’ महापालिकेत बंपर जॉब्स; करा अप्लाय रिसेप्शनिस्ट खाजगी कार्यालय, रुग्णालय किंवा कंपनीमध्ये पार्ट टाइम रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला 3000 ते 8000 रुपये मिळू शकतात. यासाठी आपल्याला 4 ते 5 तास द्यावे लागतील. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जॉबची बंपर लॉटरी; PMC मध्ये होणार 229 जागांसाठी भरती
कॉल सेंटर जॉब्स
आजकाल तरूणांमध्ये सर्वात कॉल सेंटरची जास्त क्रेझ आहे. कॉल सेंटरमध्ये डेटा एन्ट्रीचं कामही केलं जातं. यात वेगवेगळ्या वेळा असतात ज्यात रात्रीच्या वेळीही काही शिफ्ट होतात. हे काम घरी बसून देखील करू शकता. या कामासाठी 2 ते 6 तास द्यावे लागतील यासाठी 4000 ते 12000 रुपये मिळू शकतात. 1-2 नव्हे तब्बल 1535 जागांसाठी मेगाभरती; इंडियन ऑइल मिटवणार बेरोजगारांची चिंता पिझ्झा डिलिव्हरी कोणत्याही पिझ्झा शॉपमध्ये तुम्ही पिझ्झा डिलिव्हरी पार्टनर म्हणून नोकरी शकता. 5 ते 6 तासांची शिफ्ट केल्यास तुम्ही 5000 ते 8000 रुपये मिळवू शकता.