गेल्या दोन ते अडीच वर्षांत कोरोनामुळे उद्योगासह सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अद्यापही नोकऱ्यांची संधी कमी आणि उमेदवारांची संख्या जास्त अशी विषम स्थिती दिसून येत आहे. अनेक उच्चशिक्षित तरूण नोकरीच्या शोधात आहेत. माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातही स्थिती निराळी नाही. पण या क्षेत्रात तुलनेनं संधी जास्त आहे. देशातल्या प्रमुख दोन कंपन्यांकडून डाटा इंजिनिअर्स पदासाठी भरती केली जाणार आहे. माईंड ट्री आणि अॅक्सेंचर या दोन कंपन्यांमध्ये ही पदभरती होणार आहे. बेंगळुरू येथे हे पद भरले जाणार आहे. तुमच्याकडे या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव असेल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. यामुळे तुमची माईंड ट्री आणि अॅक्सेंचर या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. `कंटेट डॉट टेक गिग`ने या विषयीची माहिती दिली आहे. डाटा इंजिनीअर हा उद्योग क्षेत्रातील जास्त पगार असलेला करिअरचा सर्वोत्तम पर्याय आहे. जर तुम्ही तुमचं करिअर बदलण्याचा किंवा नवीन संधी शोधण्याचा विचार करत असाल किंवा डाटा इंजिनीअर म्हणून नोकरी शोधत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण माईंट ट्री आणि अॅक्सेंचर या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये डाटा इंजिनीअरसाठी पदभरती केली जात आहे. अॅक्सेंचर कंपनीच्या बेंगळुरू येथील कार्यालयात डाटा इंजिनीअर हे पद भरलं जाणार आहे. यासाठी उमेदवाराकडे किमान तीन वर्षाचे पायथन सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचं कौशल्य असावे. यासोबत क्लाउड इम्प्लिमेंटशनची ज्ञान असल्यास प्राधान्य त्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच उमेदवाराला पायथन आणि स्काला प्रोग्रॅमिंगचं ज्ञान असावं. उमेदवाराकडे कुबर्नेट्स सेटिंग्जचे कौशल्य असावं. तसंच फ्लिंक टास्कसह कुबर्नेट्स क्लस्टरचे व्यवस्थापन कौशल्य असल्यास (कॉन्फिगरेशन, मेमरी मॅनेजमेंट, लॉग मॅनेजमेंट, चेक पॉईंटिंग आदी) प्राधान्य दिलं जाईल. डाटा इंजिनीअरकडे अपाची फ्लिंग किंवा इतर स्ट्रीमिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बिग डाटा पाइपलाइनद्वारे टाइम सीरिज डाटा स्ट्रीमिंगसाठी प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. हेही वाचा - Job Interview ला जाताय? थांबा..थांबा; आधी ‘या’ IMP टिप्स वाचा; तुम्हालाच मिळेल नोकरी माईंड ट्री या कंपनीच्या बेंगळुरू येथील कार्यालयात डाटा इंजिनीअरची भरती केली जाणार आहे. यासाठी संबंधित उमेदवाराकडे AWS GCPच्या माध्यमातून डाटा सोल्युशन्सचा वापर करणं आणि जावा प्रोग्रॅमिंगचा अनुभव असावा. उमेदवाराकडे जावा प्रोग्रॅमिंग आणि गुगल क्लाउड डाटाफ्लो (अपाचे बीम) सोल्युशन्सचे ज्ञान असावे. तसंच डाटा अॅनॅलिटिक्स सोल्युशनसाठी ईटीएल ईएलटी डाटा पाइपलाइन्सचा वापर करण्याचा 12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा. उमेदवाराला `एनएफआर`विषयी सखोल माहिती असणं आणि हे स्पेसिफिकेशन्स वापरता येणं गरजेचं आहे. उमेदवारानं ग्राहकाची व्यावसायिक गरज आणि आयटी प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी क्लायंटच्या तांत्रिक व्यवस्थापकासोबत काम करणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे लीड डाटाबेस क्षमता नियोजन असावं तसेच तो परफॉर्मन्स इंजिनिअरिंग एक्सरसाइज सायन्स अँड इंजिनीरिंगमध्ये तज्ज्ञ असावा.