मुंबई, 06 मे: कोरोना साथीच्या रोगामुळे जगभरातील व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जगभरातील नोकऱ्यांचं स्वरूप बहुतांश प्रमाणात बदललं आहे. वर्क फ्रॉम होमची संस्कृती आता वाढू लागली आहे. बहुतांश कंपन्या अनुभवी उमेदवारांच्या शोधात असतात. अशा परिस्थितीत फ्रेशर्स आणि इंटर्न्सना नोकरीसाठी पगारात तडजोडी कराव्या लागतात. मात्र अमेरिकेत अशा काही कंपन्या आहेत. ज्या इंटर्नला महिन्याला सात लाख रुपयांपर्यंत पगार देत आहेत. glassdoor.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामधून ही माहिती समोर आली आहे. रॉब्लॉक्स (Roblox), उबर (Uber), कॅपिटल वन (Capital One), सेल्सफोर्स (Salesforce), अमेझॉन (Amazon) या 5 नामांकित कंपन्या इंटर्नला प्रत्येक महिन्याला 7,869 ते 9,574 अमेरिकी डॉलर्स (6 ते 7.3 लाख रुपये) एवढा पगार देत आहेत. याबद्दलचं सविस्तर वृत्त अजतकने प्रकशित केलं आहे. ग्लासडोअरकडून (Glassdoor) नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, इंटर्नशिप करणाऱ्या उमेदवारांना काही टेक कंपन्या सर्वाधिक पगाराची ऑफर देत आहेत. इंटर्नशिपदरम्यान सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत रोब्लॉक्स, उबर आणि सेल्सफोर्स या कंपन्या आघाडीवर आहेत. यातील रोब्लॉक्स ही एक गेमिंग कंपनी आहे. ही कंपनी इंटर्नशिपच्या काळात उमेदवारांना दरमहा सात लाख रुपयांपेक्षा जास्त पगार देत आहे. JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील वन विभागात विविध पदांसाठी जॉबची मोठी संधी; करा अर्ज
याखालोखाल उबर आणि कॅपिटल वन या कंपन्या इंटर्नशिपसाठी उमेदवारांना सहा लाखांहून अधिक पगार देत आहेत. ग्लासडोअरच्या रिपोर्टमधून आणखी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे 2020 मध्ये इंटर्नसाठी कोणत्याही ठिकाणाहून किंवा वर्क फ्रॉम होमच्या संधी वाढल्या होत्या. यामध्ये 385 टक्क्यांची वाढ दिसून आली. मात्र 2021 मध्ये त्यात थोडी घसरण झाली. 14 फेब्रुवारी 2021 ते 12 फेब्रुवारी 2022 या काळात इंटर्नना मिळालेल्या पगाराच्या आधारावर हा अभ्यास करण्यात आला आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, इंटर्नच्या पगारात अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा झाली आहे. परंतु, अशी अनेक क्षेत्रं आहेत, जिथे इंटर्न अजूनही विनामूल्य काम करताना दिसतात. ही क्षेत्र क्रिएटिव्ह आणि चॅरिटीशी संबंधित असू शकतात. 2018 ची आकडेवारी पहिली तर असं लक्षात येईल की, अमेरिकेतील 40 टक्के लोकांना इंटर्नशिपनंतर पगारच दिला गेला नाही. यावर कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या हेन्झ कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिक पॉलिसी (Carnegie Mellon University’s Heinz College of Information and Public Policy) येथील करिअर सर्व्हिसेसचे संचालक रॉन डेल्फाइन (Director of career services Ron Delphine) यांचे वेगळे मत आहे. यावर ते म्हणाले, “जर इंटर्नला चांगले पैसे दिले गेले तर ते कंपनीसाठी गुंतवणुकीसारखे आहे.” त्यांच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थी ग्लासडोअरच्या यादीतील कंपन्यांमध्ये इंटर्न म्हणून काम करत आहेत. असेही रॉन यांनी सांगितलं. अमेरिकेतील ज्या कंपन्या इंटर्नना दरमहा चांगला पगार देतात अशा 25 कंपन्याची यादी खाली दिली आहे. 1. रोब्लॉक्स - $9,667 - टेक 2. उबर - $8,333 - टेक 3. कॅपिटल वन - $8,333 - फायनान्स 4. सेल्स्फोरस - $8,167 - टेक 5. अमेझॉन - $8,000 - टेक 6. मेटा - $8,000 - टेक 7. एनव्हीडीया - $8,000 - टेक 8. लिंक्डइन - $7,500 - टेक 9. हबस्पॉट - $7,500 - टेक 10. एक्सपेडिया ग्रुप - $7,500 - टेक 11. मायक्रोसॉफ्ट - $7,366 - टेक 12. ओरॅकल - $7,250 - टेक 13. बेन अँड कंपनी - $7,125 - कन्सल्टिंग 14. डॉइच्च बँक - $7,083 - फायनान्स 15. अॅपल - $7,000 - टेक 16. इन्ट्वीट - $7,000 - टेक 17. सस्क्वेहान्ना इंटरनॅशनल ग्रुप (SIG) - $7,917 - फायनान्स JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील वन विभागात विविध पदांसाठी जॉबची मोठी संधी; करा अर्ज
18. ब्लॅकरॉक - $6,917 - फायनान्स
19. इबे - $6,833 - टेक 20. जे.पी.मॉर्गन - $6,667 - फायनान्स 21. सीटी - $6,667 - फायनान्स 22. पेपल - $6,667 - टेक 23. पोलो अल्टो नेटवर्क्स - $6,667 - टेक 24. अमेरिकन एक्सप्रेस - $6,500- फायनान्स 25. गुगल - $6,454 – टेक भारतात बहुसंख्य कंपन्यांमध्ये इंटर्न्स हे मोफत उपलब्ध असलेलं मनुष्यबळ आहे असाच समज रूढ आहे आणि तो बदलण्याचा कोणती कंपनी प्रयत्नही करत नाही. पण अमेरिकी कंपन्यांप्रमाणे भारतातही अशी सुरूवात झाली तर इंटर्न अधिक उत्साहाने जिद्दीने काम करतील.